नीरव मोदीची जप्त मालमत्ता लवकरच पंजाब नॅशनल बँकेकडे


नीरव मोदीची जप्त मालमत्ता लवकरच पंजाब नॅशनल बँकेकडे

नीरव मोदीची जप्त मालमत्ता लवकरच पंजाब नॅशनल बँकेकडे


मुंबई : हिरेव्यापारी आणि फरारी आर्थिक आरोपी नीरव मोदी याची अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केलेली ४४० कोटी रुपयांची मालमत्ता पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) परत करण्यास विशेष न्यायालयाने परवानगी दिली. नीरव मोदी आणि त्याचा नातेवाईक मेहुल चोक्सी यांच्यावर पीएनबी या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेकडून फसवणुकीने पत

सुविधा मिळवून १४ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. नीरव मोदीच्या दोन कंपन्यांना ‘फायरस्टार डायमंड इंटरनॅशनल’ (एफडीआयपीएल) आणि ‘फायरस्टार इंटरनॅशनल’ (एफआयएल) यांना दिलेल्या पत सुविधांविरोधात बँकेकडे गहाण ठेवलेल्या मालमत्ता परत करण्याच्या मागणीसाठी बँकेने जुलै २०२१ मध्ये अर्ज दाखल केले होते.

....................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या

news.mangocity.org