राज्यातील १५ जिल्हा बँकांच्या निवडणुका करोनाच्या तिसऱ्या लाटेवर अवलंबून


राज्यातील १५ जिल्हा बँकांच्या निवडणुका करोनाच्या तिसऱ्या लाटेवर अवलंबून

राज्यातील १५ जिल्हा बँकांच्या निवडणुका करोनाच्या तिसऱ्या लाटेवर अवलंबून

महाराष्ट्र: राज्यातील १५ जिल्हा बँकांच्या निवडणुका घेण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर सहकार निवडणूक प्राधिकरणाने मतदार याद्या प्रसिद्ध करण्याचा सुधारित कार्यक्रम जाहीर के ला आहे. या बँकांच्या अंतिम मतदार याद्या २७ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

मात्र, मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर किमान एक महिन्याच्या कालावधीनंतर म्हणजेच ऑक्टोबरअखेरीस प्रत्यक्ष निवडणुका होऊ शकणार आहेत. दरम्यान, करोना संसर्गाची तिसरी लाट सप्टेंबर किं वा ऑक्टोबर महिन्यात येणार असल्याचा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त के ला असल्याने जिल्हा बँकांच्या निवडणुका करोनाची तिसरी लाट येण्यावरच अवलंबून असल्याचे स्पष्ट झाले आहे.

करोना रुग्णसंख्या घटत असल्याने निर्बंध शिथिल करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपासून रखडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील १५ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे, लातूर, मुंबै, जळगाव, रत्नागिरी, धुळे-नंदूरबार, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, सातारा, नाशिक, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर आणि बुलढाणा या जिल्हा बँकांचा समावेश आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर असतील, त्या टप्प्यावर ३१ ऑगस्टपर्यंत स्थगित के ल्या आहेत. मात्र, ९ ऑगस्टच्या आदेशानुसार जिल्हा बँकांची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती, त्या टप्प्यापासूनच पुढे कार्यवाही सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार मतदार यादी कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज भरणे, अर्जांची छाननी, पात्र उमेदवारांची यादी, त्यावर मुदत आणि पात्र अंतिम उमेदवार यादी प्रसिद्धीनंतर प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे. त्याकरिता किमान एक महिन्याचा कालावधी लागणार असल्याने आणि त्याच सुमारास तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने या निवडणुकांचे भवितव्य तिसऱ्या लाटेवरच अवलंबून आहे.

अधिकाऱ्यांनी प्राप्त संस्था प्रतिनिधींचे ठराव बँके स १७ ऑगस्टपर्यंत द्यायचे आहेत. बँके ने प्रारुप मतदार यादी जिल्हा सहकार निवडणूक अधिकाऱ्याकडे २५ ऑगस्टपर्यंत सादर करायची आहे. प्रारुप मतदार यादी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांनी ३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता प्रसिद्ध करायची आहे. प्रारुप यादीवर आक्षेप सादर करण्याचा अंतिम दिनांक १३ सप्टेंबर आहे. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांनी प्राप्त आक्षेपांवर २२ सप्टेंबरपर्यंत निर्णय घ्यायचा आहे, तर अंतिम मतदार यादी २७ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्याच्या सूचना सहकार निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी दिल्या आहेत.

....................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या

news.mangocity.org