जनआशीर्वाद यात्रेप्रकरणी आयोजकांविरोधात गुन्हा

जनआशीर्वाद यात्रेप्रकरणी आयोजकांविरोधात गुन्हा
ठाणे : ठाणे शहरात सोमवारी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची जनआशीर्वाद यात्रा विनापरवाना काढण्यात आल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी यात्रेचे आयोजन करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, या यात्रेमध्ये करोना नियमांचे उल्लंघन झाल्याची नोंद या गुन्ह्यामध्ये घेण्यात आली आहे. या वृत्तास पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दुजोरा दिला आहे.
नगरसेवक संजय वाघुले, भरत चव्हाण, ठाणे शहर सरचिटणीस मनोहर सुगदरे आणि संघटन सरचिटणीस विलास साठे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कपिल पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे आयोजन ठाणे जिल्ह्यात करण्यात आले आहे. सोमवारी ठाणे शहरातून या यात्रेला सुरुवात झाली. ही यात्रा कोपरी-आनंदनगर, तलावपाली, खोपट, वागळे इस्टेट, वर्तकनगर, घोडबंदर रोड या भागांतून काढण्यात आली होती.
या यात्रेमध्ये भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते.यामुळे शहरात जागोजागी वाहतूक कोंडी झाली होती. या यात्रेमध्ये काही कार्यकर्त्यांनी मुखपट्ट्या लावल्या नव्हत्या. या यात्रेमध्ये करोना नियमांचा फज्जा उडाल्याचे दिसून आले होते. ही जनआशीर्वाद यात्रा विनापरवाना काढण्यात आल्याची बाब कारवाईतून आता पुढे आली आहे. याप्रकरणी पदाधिकाऱ्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये विनापरवाना यात्रा काढणे, मंडप उभारणे आणि करोना नियमांचे उल्लंघन करणे असा पदाधिकाऱ्यांवर आरोप ठेवण्यात आला आहे.
यात्रेत खिसेकापू; एक लाख लंपास
या यात्रेदरम्यान काही चोरटेही शिरले होते. यात्रेत सहभागी झालेल्या एका कार्यकत्र्याच्या खिशातील एक लाख रुपये चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, आणखी काही जणांचे मोबाइल आणि रोकडही चोरी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा