वृक्षारोपण व झाडांना राखी बांधून सायकलप्रेमींनी साजरे केले रक्षाबंधन
वृक्षारोपण व झाडांना राखी बांधून सायकलप्रेमींनी साजरे केले रक्षाबंधन
वृक्षारोपण व झाडांना राखी बांधून पर्यावरण रक्षणाचा संदेश, दापोली सायकलिंग क्लबचा उपक्रम
वृक्षारोपण व झाडांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा, दापोली सायकलिंग क्लबचा उपक्रम
दापोली: भावाने नेहमी आपली रक्षा करावी म्हणून बहीण भावाला राखी बांधत असते. अशाच प्रकारे वृक्ष देखील मनुष्याची रक्षा करतात. प्राणवायू, सावली, अन्नधान्य, फळ, फुले, लाकुड, औषधी इत्यादी देतात. या बाबतची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रविवार २२ ऑगस्ट २०२१ रोजी राखी पौर्णिमेला दापोली सायकलिंग क्लब मार्फत सायकल फेरी मार्गावर वृक्षारोपण आणि झाडांना राखी बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
सध्यस्थितीत ढासळत चाललेला पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांची लागवड व वनसंवर्धन आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर दापोली सायकलिंग क्लब मार्फत आझाद मैदान दापोली - पोस्टाची गल्ली- कोकंबा आळी- समर्थ नगर- गोसावी वाडी गिम्हवणे- राणे वाडी- भौजाळी शिवाजीनगर- माता रमाई स्मारक- पद्मावती मंदिर वणंद- आझाद मैदान या ८ किमी मार्गावर सायकल फेरी काढून याबाबत जनजागृती करण्यात आली व वृक्षांचे महत्व लोकांना पटवून देण्यात आले. तसेच या मार्गावर आवळा, जांभूळ, चिंच, असाणा, जारुळ, अमलतास, गुलमोहर, कोकम, सोनचाफा आदी जातीच्या सुमारे १०० वृक्षांची लागवड करुन पर्यावरणाचा संदेश देण्यात आला. ही झाडांची रोपे सावंत सर वनविभाग दापोली आणि नरेंद्र बर्वे जालगाव यांनी उपलब्ध करुन दिली. तसेच अनेक सायकलप्रेमींनी बिया जमवून सीडबॉल व रोपे पण तयार केली होती. अनिल काते यांनी सेंद्रिय खताची गोण दिली.
सायकल फेरीची सुरवात आझाद मैदान येथील झाडांना ओवाळून, राखी बांधून झाली. बांधकाम सभापती केदार परांजपे, निवेदिता प्रतिष्ठानचे प्रशांत परांजपे, दापोली, गिम्हवणे, शिवाजीनगर, वणंद येथील ग्रामपंचायत सरपंच, वाडीप्रमुख, सदस्य रोशन मंडपे, बाळकृष्ण बामणे, मनीष मंडपे, भोपे सर, हरिश्चन्द्र धोत्रे, विजय धोत्रे, दत्ताराम कुंबेटे, संतोष भुवड, आप्पा राणे, पमा सावंत, अविनाश गुजर, निलेश राऊत, किर्ती परांजपे, सुयोग घाग, प्रितेश कर्लेकर इत्यादी अनेक ग्रामस्थांनी ठिकठिकाणी सायकल फेरीचे खाऊ व पाणी वाटप करुन स्वागत केले आणि वृक्षारोपण कार्यात सहकार्य केले. काहीजण आपले कुटुंब, मुले, नातू यांच्यासोबत सायकल फेरीत सहभागी झाले होते. यामध्ये लहान सायकलस्वार ५- ६ वर्षाचा नील झगडे, काव्या परांजपे व ८१ वर्षाचे विजय गोळे सर सहभागी झाले होते. यापैकी अनेकजण आरोग्य तंदुरुस्तीसाठी, बाजारात व कामावर ये-जा करण्यासाठी या मार्गावर सायकल चालवत असतात. वृक्षारोपण केलेल्या नवीन रोपांचा सांभाळ देखभाल करण्याची जबाबदारी येथील सायकलप्रेमींनी घेतली आहे.
पर्यावरण रक्षण आणि सायकल संस्कृती जपण्यासाठी दापोली सायकलिंग क्लब तर्फे विनामूल्यपणे अनेक सामाजिक कार्यक्रम राबवले जातात. या सायकल फेरीचे नियोजन करण्यात प्रशांत पालवणकर, संजय मांजरे, सुनिल रिसबूड, अंबरीश गुरव, संदीप भाटकर, उत्तम पाटील, केतन पालवणकर इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली. वृक्षवल्ली आम्हा सोयरे या उक्तीप्रमाणे वृक्षांना राखी बांधून खऱ्या अर्थाने वृक्ष रक्षाबंधन साजरे झाले.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा