टीईटीच्या अर्जांसाठी ५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ


टीईटीच्या अर्जांसाठी ५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

टीईटीच्या अर्जांसाठी ५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ


पुणे : राज्यात प्राथमिक शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता उमेदवारांना ५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

राज्य परीक्षा परिषदेमार्फत १० ऑक्टोबरला टीईटी घेण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज करण्यास २५ ऑगस्टची मुदत देण्यात आली होती. मात्र अर्जांसाठी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आल्याने परीक्षा परिषदेने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. करोना विषाणू संसर्गामुळे टीईटी लांबणीवर पडली होती.  पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या वर्गांच्या शिक्षकांसाठी टीईटी उत्तीर्ण ही अनिवार्य पात्रता करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांचा टीईटीकडे ओढा असतो.  केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा व टीईटी परीक्षा एकाच दिवशी १० ऑक्टोबरला होणार असल्याने टीईटीची तारीख बदलण्याची मागणी या पूर्वीच परीक्षा परिषदेकडे करण्यात आली आहे.

....................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या

news.mangocity.org