विविध प्रकारच्या राख्यांनी सजली बाजारपेठ

विविध प्रकारच्या राख्यांनी सजली बाजारपेठ
यंदा किंमती देखील दहा टक्क्यांनी वाढल्या
रक्षाबंधन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे बाजारपेठात विविध प्रकारच्या राख्यानी दुकाने सजली आहेत. यंदा काही नव्या प्रकारच्या राख्या आल्या असून त्या सर्वाचे लक्ष वेधून घेत आहेत. मात्र यंदा किंमतीदेखील दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत.
वर्षभर सर्वच भाऊ-बहीण या सणाची आतुरतेने वाट पाहतात. हिंदू संस्कृतीनुसार, श्रावणातील नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते, त्यासोबतच बहिणीच्या रक्षणाचे वचन भाऊ देतो. यंदा रक्षाबंधनाला पांढरे मोती, फॅन्सी जरी आणि जरदोजी राख्यांचीही खूप मागणी आहे. या राख्या दिसायला अत्यंत साध्या आणि सुंदर असतात. घुंघरू, लाख, राजस्थानी मिरर वर्क आणि काचेची सजावट असलेल्या राख्या सर्वाचे लक्ष वेधून घेत आहेत. यामध्ये कलर्ड स्टोन, कुंदन वर्क, कलर्ड बीड्सचाही वापर करण्यात आला आहे. सोबतच यंदा काही विशेष राख्या बाजारात पाहायला मिळत आहेत. या राख्यांवर संदेश किंवा नावं, भाऊ असं सगळं लिहिलेलं असते. लहान मुलांसाठी कार्टुन राखी, बॅटरीवर चकाकणारे लाईट लावलेल्या डिजिटल राख्या आल्या आहेत. त्यांची किंमत पन्नास रुपयांपासून ते दोनशे रुपयांच्या घरात आहे. नागपुरात सर्वाधिक राख्या गुजरात, मुंबई, राजस्थान येथून येतात. मात्र इंधन दरवाढीमुळे यंदा राख्यांची किंमत दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत. दहा रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंतच्या राख्या बाजारात उपलब्ध आहेत.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
Comments
Post a Comment