एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन आणखी लांबणीवर


एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन आणखी लांबणीवर

एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन आणखी लांबणीवर

करोना आणि निर्बंधांमुळे एसटीचे उत्पन्न घटले. त्यामुळे गेल्या वर्षांपासूूनच वेतन देणेही अवघड झाले आहे.


पुढील आठवडय़ात बैठक

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन प्रश्न अद्यापही सुटला नसून जुलै महिन्याचे वेतन ऑगस्ट महिना संपत आला असतानाही कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही. वेतनसंदर्भात पुढील आठवडय़ात बैठक होणार असल्याची माहिती परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली. वेतन लांबणीवरच पडत असल्याने अनेक कर्मचाऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे.

करोना आणि निर्बंधांमुळे एसटीचे उत्पन्न घटले. त्यामुळे गेल्या वर्षांपासूूनच वेतन देणेही अवघड झाले आहे. एसटीला दैनंदिन खर्चासाठी पैसा अपुरा पडू लागल्याने महामंडळाने राज्य शासनाकडे मदतनिधी मागितला. त्यानुसार शासनाने निधी दिल्यानंतर कर्मचाऱ्यांचे गेल्या वर्षी आणि या वर्षीच्या सहा महिन्यांचे वेतन देण्यात आले. करोनाच्या दुसऱ्या लाटेतही एसटीचे प्रवासी आणि उत्पन्न वाढले नाही. त्यामुळे आता जुलै महिन्यापासून पुढे वेतन व अन्य खर्चासाठी एसटी महामंडळाच्या तिजोरीत पैसा शिल्लक राहिला नाही. परिणामी राज्यातील एसटीच्या ९८ हजार कर्मचाऱ्यांचे जुलैचे वेतन अद्याप झालेले नाही.

वेतनावर तोडगा काढावा यासाठी परिवहन राज्यमंत्री सतेज पाटलांकडेही एसटीतील संघटनांनी मागणी के ली आहे. यासंदर्भात सतेज पाटील यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडून दरवेळी निधी उपलब्ध झाला. परंतु करोनाकाळात शासनाच्या तिजोरीतही पुरेसा पैसा नाही. तरीही एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न के ला जात आहे. पुढील आठवडय़ात बैठक होऊन तोडगा निघेल, अशी माहिती त्यांनी दिली.

....................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या

news.mangocity.org