ज्येष्ठ गायिका जगजीत कौर यांचे निधन

 


ज्येष्ठ गायिका जगजीत कौर यांचे निधन

ज्येष्ठ गायिका जगजीत कौर यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ गायिका जगजीत कौर यांचे रविवारी सकाळी ६ वाजता निधन झाले. त्या ९३ वर्षांच्या होत्या. संगीतकार खय्याम यांच्या त्या पत्नी होत.
जगजीत कौर यांच्या पार्थिवावर विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

‘शोला और शबनम’ चित्रपटातील ‘पहले तो आँख मिलाना’, ‘बाजार’ चित्रपटातील ‘देख लो आज हमको जी भर के ’ अशी त्यांनी गायलेली काही निवडक गाणी प्रसिद्ध आहेत.

पन्नासच्या दशकाच्या सुरुवातीला जगजीत कौर यांनी आपल्या गायन कारकीर्दीला प्रारंभ केला होता. त्यांनी सुरुवातीला पंजाबी गीते गायली होती. ‘पोस्ती’, ‘दिल-ए-नादान’सारख्या चित्रपटातून त्यांनी गाणी गायली. १९५४ साली त्यांचा खय्याम यांच्याशी विवाह झाला होता. त्यांचा विवाह हा त्या काळातील सुरुवातीच्या आंतरधर्मीय विवाहांपैकी मानला जातो. खय्याम यांनी संगीतबद्ध के लेल्या ‘उमराव जान’ चित्रपटातील काही गाणी त्यांनी गायली होती.

वहिदा रहमान यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘शगुन’ चित्रपटातील ‘तुम अपना रंजो गम, अपनी परेशानी मुझे दे दो’ हे गाणेही जगजीत कौर यांनी गायले होते. समकालीन गायिकांप्रमाणे त्यांनी खूप गाणी गायली नाहीत. निवडक पण उत्तम गाण्यांसाठी त्या ओळखल्या जातात. ‘खय्याम जगजीत कौर के पीजी चॅरिटेबल ट्रस्ट’ या संस्थेंतर्गत त्यांचे सामाजिक कार्यही सुरू होते.

.....................................
------------------------------

www.freshnewz.in

Comments