ऐतिहासिक विजय : क्रिकेटची पंढरी जिंकणाऱ्या कोहलीच्या नावे ‘विराट’ विक्रमाची नोंद!


Eng vs Ind virat kohli sets new record by beating england in lords test

ऐतिहासिक विजय : क्रिकेटची पंढरी जिंकणाऱ्या कोहलीच्या नावे ‘विराट’ विक्रमाची नोंद!

लॉर्ड्स कसोटीत भारताने इतिहास रचत इंग्लंडवर १५१ धावांनी विजय मिळवला. या कसोटीच्या पाचव्या दिवशी इंग्लंडला ६० षटकात २७२ धावांचे आव्हान मिळाले होते, पण भारतासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. इंग्लंडचा एकही फलंदाज झुंज देताना दिसला नाही. त्यांचे सर्व फलंदाज दुसऱ्या डावात ५१.५ षटकात १२० धावांत गारद झाले. भारताकडून मोहम्मद सिराजने ४, इशांतने ३ तर मोहम्मद शमीने २ बळी घेत इंग्लंडच्या डावाला सुरूंग लावला. पहिल्या डावात शतकी खेळी करणाऱ्या भारताच्या लोकेश राहुलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. भारताने या विजयासह पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर भारतीय संघाने कसोटीत इंग्लंडला पराभूत करण्याची ही तिसरीच वेळ आहे. महेंद्रसिंह धोनीच्या धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०१४ मध्ये लॉर्ड्सवर शेवटच्या वेळी ९५ धावांनी विजय मिळवला होता. यापूर्वी भारताने १९८६मध्ये लॉर्ड्सवर प्रथमच विजय मिळवला होता. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली लॉर्ड्सवर भारत जिंकला. आता विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने लॉर्ड्सवर जिंकून इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे.

.....................................
------------------------------

www.freshnewz.in

Comments