महिलांचा आदर ते प्रसारमाध्यमांना सल्ला; तालिबान्यांनी पहिल्या पत्रकार परिषदेत जगाला काय सांगितले?

महिलांचा आदर ते प्रसारमाध्यमांना सल्ला; तालिबान्यांनी पहिल्या पत्रकार परिषदेत जगाला काय सांगितले?
तालिबानने काबूल ताब्यात घेतल्यानंतरच्या पहिल्या अधिकृत पत्रकार परिषदेत इस्लामिक कायद्याच्या मर्यादेत महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचे वचन दिले.काबुलमधील प्रेसिडेंशियल पॅलेसच्या आतून पत्रकार परिषदेला संबोधित करताना तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद म्हणाले की, महिलांच्या हक्कांचे संरक्षण इस्लामिक कायद्याच्या मर्यादेत केले जातील. याआधी तालिबानने मंगळवारी देशातील सर्व लोकांना सार्वत्रिक माफी जाहीर करतानाच अभय दिले होते. महिलांनीही सरकारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. त्यांनी देशातील लोकांमध्ये असलेले भीतीचे वातावरण कमी करण्यासाठी ही घोषणा केली होती.
अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबान्यांनी त्यांची पहिली पत्रकार परिषद घेतली आणि आंतरराष्ट्रीय समुदायाची महिलांच्या बाबतीत असलेल्या चिंतेबाबत आपली भूमिका मांडली. तालिबानने मंगळवारी इस्लामिक कायद्यांतर्गत महिलांच्या हक्कांचा आदर करण्याचे वचन दिले आणि त्यांना विरोध करणाऱ्यांना माफी जाहीर केली आहे. तालिबानने अफगाणिस्तान सुरक्षित करण्याचे आश्वासन दिले आहे. तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद म्हणाले की, संघटनेची सैनिकांना कोणाचाही सूड घ्यायचा नाही आणि सर्वांना माफ करण्यात आले आहे.
तालिबानने १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात महिलांच्या जीवन आणि हक्कांवर कठोर निर्बंध लावले होते. अशा परिस्थितीत तालिबानच्या प्रवक्त्याचे हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. तालिबानला खाजगी माध्यमे स्वतंत्र्य असावीत, पण पत्रकारांनी देशाच्या मूल्यांविरूद्ध काम करू नये, असेही मुजाहिद म्हणाले.
त्यांनी वचन दिले की तालिबान अफगाणिस्तान सुरक्षित करतील. त्यांनी असेही म्हटले की ज्या लोकांनी मागील सरकारसोबत किंवा परदेशी सरकार किंवा सैन्याबरोबर काम केले त्यांच्यावर कोणताही सूड उगवायचा नाही. आम्हाला इतर देशांशी शांततापूर्ण संबंध हवे आहेत.
त्याच्या पहिल्या पत्रकार परिषदेत, तालिबानच्या प्रवक्त्याने म्हटले: ‘आम्ही खात्री देतो की कोणीही त्यांच्या दारात जाऊन त्यांनी मदत का केली हे विचारणार नाही.’ त्याआधी तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचे सदस्य इमानुल्ला सामंगानी यांनी महिलांना सरकारमध्ये सामील होण्यास प्रोत्साहित करेल असे वचन दिले होते.
अफगाणिस्तानची जमीन इतरांना वापरता येणार नाही
अफगाणिस्तान आपली जमीन इतर कोणत्याही देशाला लक्ष्य करण्यासाठी वापरू देणार नाही यावरही प्रवक्त्याने भर दिला. तालिबानने २०२० मध्ये अमेरिकेशी केलेल्या करारात हे आश्वासन दिले होते. या करारानंतर अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य मागे घेण्याचा मार्ग मोकळा झाला.
परदेशी नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही
अफगाणी नागरिकांना आधीच्या राजवटीसारखी परिस्थिती पुन्हा येईल याची भीती वाटत आहे. पण महिलांना इस्लामिक कायद्यानुसार अधिकार दिले जातील, असे सांगून मुजाहिद यांनी अनेक अफगाणिस्तान आणि परदेशी नागरिकांच्या प्रमुख चिंता दूर करण्याचा प्रयत्न केला.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
Comments
Post a Comment