ग्रामस्थांची एस. टी विना होणारी फरपट थांबणार
ग्रामस्थांची एस. टी विना होणारी फरपट थांबणार
रत्नागिरी: जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील कुडूक खुर्द हे अतिशय दुर्गम भागात वसलेलं एक. या गावात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते. त्यामुळे मंडणगड आगारातून होणारी सार्वजनिक एस.टी वाहतूक सेवा शुक्रवार दि. १३/८/२०२१ पासून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली. मंडणगड आगारास विचारणा केली असता त्यांनी सांगितले की रस्ते खड्डेमय असल्यामुळे वाहतूक सेवा बंद करण्यात आली कारण एखादे वेळेस चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यास अनुचित प्रकार घडू नयेत या करीता खबरदारी उपाय म्हणून आपली सेवा खंडीत करण्यात आली आहे. संबंधित विभागास खड्डे भरण्यासाठी मागणी करीत असताना देखील प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे संबंधित क्षेत्रातील तरुण वर्ग, जेष्ठ नागरिक, स्त्रिया तसेच आजारी व्यक्तीस सार्वजनिक वाहतुकी अभावी दुसरा पर्यायच नाही. त्यामुळे त्यांची प्रचंड गैरसोय होत आहे.
सरकारी दवाखाना, भाजी मंडई, किराणा दुकाने, औषधालये सर्व काही तालुक्यात असल्या कारणाने सार्वजनिक वाहतुकी अभावी तेथील ग्रामस्थांना खुप मनस्ताप सहन करावा लागत आहे.
गावामध्ये येणारी एकमेव मंडणगड-नरवण व्हाया कुडुक खुर्द ही वाहतूक सुद्धा ठप्प करण्यात आली. त्यामुळे या गैरसोयींना कंटाळून आपण कायमच दुर्लक्षित या भावनेने कुडूक खुर्द बौद्धवाडी येथील ग्रामस्थांनी आपल्या श्रमदानातून गुजरकोंड चढावातील मुख्य वाहतुक रस्ता डागडुजी करून खड्डेमुक्त केला. त्यामुळे दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
ग्रामस्थांनी दाखविलेल्या एकजुटीमुळे संबंधित समस्या निकालात काढली असून त्यामुळे दुर्गम भागातील कुडूक खुर्द बौद्धवाडी, गुजरकोंड, हनुमान वाडी, रामवाडी, जंगम वाडी सोबतच तेरडी येथील ग्रामस्थांची एस. टी विना होणारी फरपट थांबणार आहे.
या प्रसंगी कुडूक खुर्द बौद्धवाडीचे ग्रामस्थ दिपक खैरे, सौरभ खैरे, विठ्ठल खैरे, सुधिर खैरे, विशाल सकपाळ, भगवान. द खैरे, तुळशिराम खैरे, गौतम खैरे, प्रदीप हाटे, रंजना खैरे, पुष्पा मोहीते, मिलिंद खैरे, गणेश खैरे, दशरथ खैरे, अशोक खैरे, संदेश खैरे, बळीराम खैरे, प्रमोद खैरे, अरुण खैरे, रामदास खैरे, दत्ताराम खैरे सचिन चिवीलकर, शरद खैरे, सुरज खैरे व सदानंद भोसले यांच्या श्रमदानातून कुडूक खुर्द गावातील सार्वजनिक वाहतूकीच्या समस्येचे निराकरण करण्यात आले त्यावेळेस सामाजिक कार्यकर्ते आयु. श्याम भिकुराम खैरे यांच्या पत्नी सौ. शर्मिला श्याम खैरे यांनी संबंधित श्रमदान करणाऱ्या ग्रामस्थांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा