गोरेगाव स्थानकाजवळ पादचारी पुलाचा विस्तार


Advertisement


गोरेगाव स्थानकाजवळ पादचारी पुलाचा विस्तार

रेल्वेमार्ग ओलांडण्याच्या घटनांना आळा बसणार

मुंबई : दोन रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेमार्ग ओंलाडण्याच्या प्रकाराला आळा बसावा यासाठी स्थानकाजवळच नवीन पादचारी पूल उभारणे किंवा स्कायवॉकला पादचारीपूल जोडण्याचे काम के ले जात आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून (एमआरव्हीसी) करण्यात येणारे हे काम गोरेगाव स्थानकाजवळही पूर्ण करण्यात आले आहे. पाचवी मार्गिका आणि लूप मार्गिकेवरून जाणाऱ्या मधल्या पादचारी पुलाचा विस्तार करून तो गोरेगाव स्थानक पूर्वेकडील स्कायवॉकला जोडला आहे. हा स्कायवॉक यापूर्वी पालिकेच्या पादचारी पुलाला जोडला आहे. आता रेल्वेच्याही पुलाला तो जोडण्यात आला आहे. एमआरव्हीसीकडून पादचारी पुलाची  रुंदी सहा मीटर केली आहे. हे काम केल्याने गोरेगाव स्थानकाजवळील रेल्वेमार्ग ओलांडताना होणाऱ्या अपघातांना आळा बसेल. या कामासाठी पाच कोटी ७५ लाख रुपये खर्च आला आहे.

......................................
------------------------------


Comments