अर्थमंत्र्यांची सरकारी बँकांच्या प्रमुखांसोबत आज बैठक

अर्थमंत्र्यांची सरकारी बँकांच्या प्रमुखांसोबत आज बैठक
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बुधवारी देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांसोबत बैठक घेणार आहेत. बैठकीत बँकांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे. शिवाय करोनामुळे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा अपेक्षित आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत होत असलेल्या या बैठकीत, अर्थव्यवस्थेतील मागणी आणि उपभोग वाढवण्याच्या अंगाने बँकिंग क्षेत्राचे महत्त्व लक्षात घेऊन आवश्यक त्या पावलांवर ठोस निर्णयाची शक्यता आहे.
बँकेने जाहीर केलेल्या कर्ज पुनर्रचना योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा आढावा बैठकीत घेतला जाणार आहे. तसेच उत्पादक क्षेत्रांसाठी अधिक कर्जपुरवठा करण्यासाठी बँकांना सूचना दिल्या जाण्याची शक्यता आहे. बँकांच्या बुडीत कर्जाचा (एनपीए) सविस्तर आढावा घेतला जाणार असून कर्जवसुलीत वाढीच्या अंगाने पावले टाकली जाणार आहेत.
बँकांच्या बुडीत कर्जाच्या प्रमाणात घट झाली आहे. ३१ मार्च २०२१ अखेर बँकांच्या नक्त ‘एनपीए’चे प्रमाण ६,१६,६१६ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. जे गेल्या वर्षी याच काळात ६,७८,३१७ कोटी रुपये होते, तर त्याआधीच्या वर्षात म्हणजे ३१ मार्च २०१९ अखेर ते ७,३९,५४१ कोटी रुपये होते.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा