कुंभारांची घागर यंदाही उताणी

कुंभारांची घागर यंदाही उताणी
राज्य सरकारने दहीहंडी उत्सवाला परवानगी नाकारल्याने कुंभार व्यावसायिकांचा हक्काचा हंगाम बुडाला आहे.
महाराष्ट्र: राज्य सरकारने दहीहंडी उत्सवाला परवानगी नाकारल्याने कुंभार व्यावसायिकांचा हक्काचा हंगाम बुडाला आहे. यंदा उत्सव होण्याच्या आशेने तयार केलेली मडकी आता मागणीअभावी पडून आहेत. जवळपास ७५ टक्के मागणी घसरल्याचे मडके उत्पादकांनी सांगितले.
दहीहंडी, नवरात्री, दिवाळी, मकरसंक्रांत अशा काही उत्सवांच्या निमित्ताने कुंभार व्यवसायाला चालना मिळत असते. त्यामुळे मागणी लक्षात घेऊन मातीकामातून दिवे, माठ, मडकी बनवण्याचे काम वर्षभर व्यावसायिक करत असतात. करोनामुळे सण-उत्सवांवर मर्यादा आल्याने त्यांचे उत्पन्नाचे साधन गेले आहे. श्रावणानंतर उत्सवांना सुरुवात होत असल्याने दहीहंडी हा कुंभार व्यावसायिकांच्या दृष्टीने कमावण्याचा पहिला सण. सध्या करोनास्थिती आटोक्यात आल्याने दहीहंडी उत्सव साजरा होईल, अशी आशा व्यावसायिकांना होती, परंतु शासन निर्णयानंतर त्यांचा अपेक्षाभंग झाला.
मोठय़ा दहीहंडी मोजक्याच असल्या तरी स्थानिक विभागांमध्ये हा उत्सव मोठय़ा प्रमाणावर केला जातो. धारावीतील कुंभारवाडय़ातून मुंबईभर ही मडकी पुरविली जातात. ‘कुंभारवाडय़ात यंदाही हजारो मडकी घडवण्यात आली. परंतु मागणीच नसल्याने ती वर्षभर पडून राहणार आहेत. दहीहंडी उत्सवाला परवानगी नाकारल्याने विशेष फटका बसणार आहे. उत्सव साजऱ्या करणाऱ्या मंडळांकडून मडक्यांना मोठी मागणी असते, परंतु यंदा मागणीत घट झाली आहे. शिवाय उत्सव बंद असल्याने पूर्वी ५० मडकी घेऊन जाणारे आता जेमतेम पाच मडकी घेत आहेत,’ अशी माहिती धारावीतील कुंभार व्यावसायिकांनी दिली.
मातीची वस्तू वर्षभर सांभाळणे जोखमीचे असल्याने काही व्यवसायिकांनी मात्र अंदाज घेऊन कमी उत्पादन घेतले. पहिलाच सण सुना गेल्याने व्यावसायिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
गेल्या वर्षी उत्सव झालाच नाही. यंदा तो होईल असे वाटले, पण पदरी निराशाच आली. हा सण लाखोंनी पैसे मिळवून देणारा नसला तरी या सणापासून ग्राहक कुंभारवाडय़ाकडे येऊ लागतात. यंदा बाजारात शुकशुकाट आहे. स्थानिक पातळीवर, चाळ, इमारतींमध्ये दहीहंडी उत्सव होणार असल्याने काही प्रमाणात ग्राहक आहेत. ही मागणी केवळ २५ टक्के असून नुकसान मोठे आहे.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा