संगमेश्वर लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी जमूरत अलजी यांची फेरनिवड




संगमेश्वर लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी जमूरत अलजी  यांची फेरनिवड


संगमेश्वर प्रतिनिधी

                    सामाजिक कार्यकर्ते, गावचे कार्यसम्राट माजी सरपंच जमूरत अलजी यांच्या कामाची दखल घेत दुसऱ्यांदा संगमेश्वर लायन्स क्लबच्या अध्यक्ष पदावर फेर निवड करण्यात आली आहे.

                     जमूरत अलजी यांना गेल्या वर्षी सुद्धा संगमेश्वर लायन्स क्लबचे अध्यक्ष पद देण्यात आले होते. त्या काळात लायन्स क्लबच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांना मदत करून वेगळे उपक्रम राबवून आणि लायन्स क्लब कामाची वेगळी छाप निर्माण केली आहे.परिसरामध्ये वेगवेगळे लायन्स क्लबच्या माध्यमातून उपक्रम राबवून गरजूंना मदत करून शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य करून बचत गटांना मार्गदर्शन करणे असे वेगवेगळे उपक्रम लायन्स क्लबच्या माध्यमातून करण्यात आले आहे. लायन्स क्लब चे संगमेश्वर तालुक्यामध्ये होत असलेले काम हे कौतुकास्पद असून सामाजिक बांधिलकी राखून लोकांपर्यंत मदत पुरवण्याचे काम लायन्स क्लबच्या माध्यमातून केले जात आहे. लायन्स क्लब मध्ये जमूरत अलजी या  सामाजिक कार्यकर्त्याला पुन्हा संगमेश्वर लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड करण्यात आल्याने त्यांची परिसरातून कौतुक केले जात आहे 

           दुसऱ्यांदा अध्यक्ष पद मिळाल्यानंतर जमूरत अलजी  यांनी आपले सामाजिक कार्याचे नियोजन केले असून लायन्स क्लबच्या माध्यमातून परिसरामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून लोकांना मदत करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. लायन्स क्लब ही एक सामाजिक बांधिलकी राखून काम करणारी संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून गरजूंपर्यंत पोहोचत त्यांच्या समस्या सोडवून वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून लोकांना न्याय देण्याचे काम लायन्स क्लबच्या माध्यमातून होणार आहे.मला मिळालेल्या संधीचे मी भविष्यात सोने करणार असल्याचा ध्यास जमूरत अलजी यांनी व्यक्त केला.लायन्स क्लबच्या शपथ विधी नुकताच संगमेश्वरला पार पडला त्यावेळेस शपथ ग्रहण अधिकारी नितीन गांधी, सचिव योगेश भिंगार्डे,नंदू पटेल, सतीश पटेल, ला. विवेक शेरे,माजी प्रांतपाल

 उदय लोध, रिजन चेअरमन संजू पटेल,झोन चेरमन

प्रमोद खेडेकर,मनिष चोचे,मनोहर पटेल,दिलीप राहाटे,शशिकांत पटेल,महेश उपळेकर,रविकांत शिंदे शंकर भिंगार्डे,गुलाल पारेख, यशवंत सैतेवडेकर,सुशांत कोळवणकर, आदी उपस्थिती होते

.................................
------------------------------

www.freshnewz.in


टिप्पण्या

news.mangocity.org