पोलिसांनी सत्ताधाऱ्यांच्या कलाने काम करणे उद्वेगजनक! सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

पोलिसांनी सत्ताधाऱ्यांच्या कलाने काम करणे उद्वेगजनक!सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
नवी दिल्ली : ‘‘पोलीस अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या कलाने काम करतात आणि सत्ताबदलानंतर नवा सत्तारूढ पक्ष संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करतो, हे प्रकार वाढले आहेत. हे चित्र उद्वेगजनक आहे,’’ अशी टिप्पणी सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांनी गुरुवारी केली.
छत्तीसगड पोलीस अकॅडमीचे निलंबित संचालक, आयपीएस अधिकारी गुरजिंदरपाल सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने पोलीस अधिकारी आणि सत्ताधारी यांच्यातील हितसंबंधांवर भाष्य केले. भाजप काळात रायपूर, दुर्ग आणि बिलासपूरचे पोलीस महानिरीक्षक म्हणून काम केलेल्या गुरजिंदरपाल सिंह यांच्याविरोधात छत्तीसगडमधील विद्यमान काँग्रेस सरकारने जूनमध्ये बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर त्यांच्याविरोधात राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला.
सिंह यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालकासह महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. मात्र, त्यांच्याविरोधात राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आहे, असे त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. सिंह यांना चार आठवडे अटक करू नये, असे निर्देश देताना सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या खंडपीठाने सत्ताबदलानंतर राजद्रोहाच्या गुन्हेनोंदीच्या वाढत्या प्रमाणाबद्दल चिंता व्यक्त केली.
‘‘देशात अस्वस्थ करणारी स्थिती आहे. त्यास पोलीस खातेही जबाबदार आहे. एखादा राजकीय पक्ष सत्तेवर असतो तेव्हा पोलीस अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या कलाने काम करतात आणि प्रतिस्पर्धी पक्ष सत्तेवर आल्यानंतर अशा पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करतो. हे थांबले पाहिजे,’’ असे न्यायालयाने स्पष्ट केले.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा