मोसमी पावसावर वायुप्रदूषणाचा दुष्परिणाम


मोसमी पावसावर वायुप्रदूषणाचा दुष्परिणाम

मोसमी पावसावर वायुप्रदूषणाचा दुष्परिणाम

१९५१ ते २०१९ या काळात नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या सरासरीमध्ये घट झालेली दिसत आहे.


मुंबई : वायुप्रदूषणाचा परिणाम देशातील मोसमी पावसावरही होत असल्याचे तज्ज्ञांच्या अभ्यासातून स्पष्ट होत आहे. ‘आंथ्रोपोजेनिक एरोसोल्स अ‍ॅण्ड द विकनिंग ऑफ द साऊथ एशियन समर मान्सून्स’ या अहवालानुसार वायुप्रदूषणामुळे मोसमी पावसाचे स्वरूप अनियमिततेकडे झुकत आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंजच्या (आयपीसीसी) क्लायमेट चेंज २०२१ – द फिजिकल सायन्स बेसिस’ या अहवालातही याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. १९५१ ते २०१९ या काळात नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या सरासरीमध्ये घट झालेली दिसत आहे. ही परिस्थिती येत्या काही वर्षांत कायम राहणार असून यात वायुप्रदूषणाचा मोठा वाटा असेल. ‘वायुप्रदूषणामुळे देशभरात नैर्ऋत्य मोसमी पावसाचे प्रमाण १० ते १५ टक्कय़ांनी कमी होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पावसाच्या प्रमाणात ५० टक्के  कमतरताही येऊ  शकते. वायुप्रदूषणाचा परिणाम पावसाचे आगमन आणि गतिशीलता यांच्यावरही होऊ  शकतो. वायुप्रदूषणामुळे भूपृष्ठाचे तापमान अपेक्षित मर्यादेपर्यंत वाढू शकत नाही. वातावरणातील प्रदूषकांच्या अस्तित्वामुळे भूपृष्ठाची तापमानवाढ कमी प्रमाणात होते’, असे भारतीय प्रौद्योगिक संस्था, दिल्ली (आयआयटी दिल्ली) येथील वातावरण विज्ञान कें द्राचे (सेंटर फॉर अटमोस्फे अरिक सायन्सेस) साहाय्यक प्राध्यापक डॉ. दिलीप गांगुली यांनी सांगितले.

 शास्त्रज्ञांच्या मते, प्रदूषकांचे पर्जन्यमानावर दोन प्रकारचे परिणाम होतात. प्रत्यक्ष परिणाम म्हणजे किर्णोत्सर्गी परिणाम. यात प्रदुषकांमुळे सूर्य किरणे जमिनीपर्यंत पोहोचण्यात अडथळा निर्माण होतो. अप्रत्यक्ष परिणाम म्हणजे प्रदुषके  सूर्य किरणे शोषून घेतात.

 यामुळे पावसाळी ढग निर्माण होण्याच्या प्रक्रियेत व्यत्यय येतो. दोन्ही प्रकारच्या परिणामांमुळे भूपृष्ठ थंडावते, वातावरणात स्थिरता येते व उष्णता पसरण्याची क्षमता कमी होते. यामुळे बाष्पीभवनात घट होऊन पर्जन्यमानावर परिणाम होतो.

 पुण्याच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरिओलॉजीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जमीन आणि समुद्राच्या तापमानातील फरकामुळे पाऊस पडतो.

 सध्या वेगाने वाढणाऱ्या समुद्रपृष्ठाच्या तापमानामुळे जमीन आणि समुद्राच्या तापमानाचे गुणोत्तर कमकु वत होत आहे. हरितगृह वायूंमुळे समुद्रपृष्ठाचे तापमान भूपृष्ठापेक्षा वेगाने वाढत आहे. हवेतील प्रदूषकांमुळे भारतीय उपखंडातील भूपृष्ठाचे तापमान मंदगतीने वाढत आहे.

....................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या

news.mangocity.org