बारावी निकालाच्या संकेतस्थळावर सायबर हल्ला?

बारावी निकालाच्या संकेतस्थळावर सायबर हल्ला?
दहावीच्या निकालादरम्यानही घातपाताची शक्यता
मुंबई : बारावीचे अवघे १३ लाख विद्यार्थी असताना ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’चा (राज्य शिक्षण मंडळ) निकाल ऑनलाइन जाहीर झाल्या झाल्या अवघ्या तासाभरात तब्बल साडेतीन कोटी ‘हिट्स’ आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हा एक प्रकारे ‘सायबर हल्ला’ असून अवघ्या दोन आठवडय़ांपूर्वी जाहीर झालेल्या दहावी निकालाचे संके तस्थळ कोसळण्यामागेही घातपात असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
१६ जुलैला दहावीचा निकाल ऑनलाइन जाहीर होण्याच्या (दुपारी १ वाजता) आधीच म्हणजे दुपारी १२.५८च्या सुमारास मंडळाचे संके तस्थळ कोलमडून (क्रॅ श) पडले होते. ते पाच-सहा तासांनी म्हणजे सायंकाळच्या सुमारास पूर्वपदावर आले. तोपर्यंत या परीक्षेला बसलेले १६ लाख विद्यार्थी आणि त्यांचे पालक, शाळाचालक निकाल पाहता येत नसल्याने चांगलेच हवालदिल झाले. मंडळाने दहावी-बारावीचे निकाल ऑनलाइन लावण्यास सुरुवात के ल्यानंतर असे प्रथमच घडत होते. या अभूतपूर्व गोंधळानंतर शालेय शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमून या प्रकाराचा छडा लावण्याचा निर्णय घेतला. तसेच, त्यानंतर जाहीर होणाऱ्या बारावीच्या निकालादरम्यान अशी फजिती होऊ नये म्हणून तांत्रिक उपाययोजना के ल्या.
३ ऑगस्टला बारावीचा निकाल जाहीर झाला. संके तस्थळ कोलमडू नये म्हणून मंडळाने आपल्याच पाच वेगवेगळ्या संके तस्थळावर निकाल पाहण्याची सोय उपलब्ध करून दिली. तसेच प्रत्येक संके तस्थळाची क्षमताही प्रत्येकी १ कोटी हिट्सपर्यंत वाढविण्यात आली. एरवी ती खूपच कमी असते. या वेळी मंडळाबरोबरच शालेय शिक्षण विभागातील अधिकारीही सावध असल्याने त्यांचे पाचही संके तस्थळांवर बारकाईने लक्ष होते. याशिवाय प्रत्येक संके तस्थळाचे ‘ऑटो स्के लिंग’ करण्यात येत होते. त्यात निकाल जाहीर होताच अवघ्या तासाभरात साडेतीन कोटी हिट्स संके तस्थळावर मिळाल्याचे लक्षात आले. हा आकडा सायंकाळी साडेसातपर्यंत पाच कोटींवर गेला. बारावीचे अवघे १३ लाख १९ हजार विद्यार्थी असताना पाच कोटी हिट्स कसे, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे. त्यातही पहिल्या तासाभरात साडेतीन कोटी हिट्स ही बाब चक्रावून टाकणारी आहे.
‘निकालाच्या दिवशी पाच संके तस्थळांची क्षमता वाढविली नसती तर पाच कोटी हिट्समुळे दहावीप्रमाणे बारावी निकालाचे संके तस्थळही कोसळले असते. हा प्रकार घातपाताशिवाय शक्य नाही. त्यामुळे या प्रकाराला सायबर हल्लाच म्हटले पाहिजे,’ अशी प्रतिक्रि या शालेय शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याने व्यक्त के ली. दहावीच्या निकालादरम्यानही हा प्रकार घडला का, या दिशेने तपास सुरू असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.
डाऊनलोड अवघे १० लाख
जे निकाल पाहण्याकरिता संकेतस्थळाला भेट देतात ते निकालही डाऊनलोड करतात. पण, पाच कोटी हिट्स मिळूनही डाऊनलोड झालेल्या निकालांची संख्या अवघी १० लाख होती.
बारावीच्या निकालादरम्यान पहिल्या तासाभरात साडेतीन कोटी हिट्स आले. बारावीचे विद्यार्थी अवघे १३ लाख असताना इतके हिट्स येण्याचे कारण नव्हते. आमची पुरेशी तयारी होती म्हणून संकतस्थळ कोसळले नाही आणि विद्यार्थी-पालकांना त्रास झाला नाही. हा सायबर हल्ला होता की नाही, हे तपासात समोर येईलच. पण, यापुढे निकाल जाहीर करण्यापूर्वी पुरेशी काळजी घेतली जाईल.
*दिनकर पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा