‘एसटी’ कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतनश्रेणीबाबत भेदभाव!







‘एसटी’ कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतनश्रेणीबाबत भेदभाव!

‘एसटी’ कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतनश्रेणीबाबत भेदभाव!

एसटी महामंडळात १८० दिवस रोजंदारीवर काम केलेल्या कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणीवर घेतले जाते. वर्धा, ठाणे विभाग नियंत्रक कार्यालयासह इतरही काही कार्यालयांच्या अखत्यारित असलेल्या या कर्मचाऱ्यांना असा लाभ दिला गेला आहे. परंतु नागपूरसह इतर काही विभागात मात्र हा लाभ नाकारण्यात आला आहे. एकाच विभागात एकाच पदासाठी वेगवेगळे निकष लावले जात असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

एसटी महामंडळात  वाहक, चालकासह इतरही कर्मचारी रोजंदारीवर घेतले जातात. या  कर्मचाऱ्यांनी सलग १८० दिवस सेवा दिल्यास त्यांना नियमित वेतनश्रेणी दिली जाते. परंतु, कडक टाळेबंदीमुळे एसटीची आर्थिक स्थिती खालावली. या काळात  कार्यालयांतील उपस्थितीवर निर्बंध आल्याने बऱ्याच कर्मचाऱ्यांना कामावर  येण्यास प्रतिबंध घालण्यात आला. काही कार्यालयांत मात्र कर्मचारी आलटून-पालटून वेगवेगळ्या दिवशी बोलावले गेले. त्यातच या काळात प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या लॉक डाऊन हजेरी लावण्यात आल्या. त्यात रोजंदारी कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. या कर्मचाऱ्यांना हजेरी पकडूनच वेतनवाढही मिळाली.

दरम्यान, १८० दिवसानंतर नियमित वेतनश्रेणीवर घेण्याबाबत मात्र वेगवेगळ्या विभाग नियंत्रक कार्यालयात वेगवेगळे निकष लावले गेले. याबाबत महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे माजी आगार सचिव मंगेश कामडी म्हणाले, ठाणे, वर्धेसह इतरही काही मंडळात तेथील विभाग नियंत्रक कार्यालयाने कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणी दिली. परंतु नागपुरात ती मिळाली नाही. या कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणी देण्याबाबत शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनीही परिवहन मंत्री अनिल परब यांना पत्र लिहिल्याचेही कामडी यांनी सांगितले.

करोना काळातील हजेरी पकडून १८० पूर्ण होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणी मिळायला हवी. तो त्यांचा हक्क आहे. सर्व विभाग नियंत्रक कार्यालयात याबाबत आदेश न निघाल्यास आंदोलन केले जाईल. – मुकेश तिगोटे,  सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक).

 

या कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतनश्रेणीबाबत नियमानुसार विभाग नियंत्रक कार्यालय स्तरावर प्रक्रिया होते. त्याचा मुख्यालयाशी संबध नाही.   कामगारांनी कोविड काळात सेवा दिल्यामुळे काही कार्यालयातील नियमित वेतनश्रेणीबाबतचा निर्णय झाला असावा. ज्यांची सेवा पूर्ण नाही व आता पूर्ण होत असेल तर  लवकरच त्यांना लाभ मिळेल. – शेखर चन्नो, एसटीचे उपाध्यक्ष आणि  व्यवस्थापकीय संचालक,

.....................................
------------------------------

www.freshnewz.in

Comments