जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची घोषणा करा!यशवंत सिन्हा यांची पंतप्रधानांकडे मागणी

जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची घोषणा करा!यशवंत सिन्हा यांची पंतप्रधानांकडे मागणी
मुंबई : जम्मू आणि काश्मीरला पुन्हा संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात करावी आणि त्यानंतर राज्यात मुक्त आणि मोकळ्या वातावरणात विधानसभेची निवडणूक घ्यावी, अशी मागणी राष्ट्रमंचचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी केली आहे.जम्मू आणि काश्मीरला अनुच्छेद ३७० नुसार असणारा विशेषाधिकार काढून दोन वर्षे झाली. केंद्रातील मोदी सरकारने राज्यातील जनतेला विश्वासात न घेता एवढा महत्त्वाचा निर्णय घेतला होता. गेले दोन वर्षे राज्यात विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामुळे सामान्य लोकांना मुक्तपणे वावरता येत नाही किंवा त्यांना मते मांडता येत नाही. अफगाणिस्तानमधील बदलत्या परिस्थितीमुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये त्याचे पडसाद उमटू शकतात. हे सारे लक्षात घेता जम्मू आणि काश्मीरमध्ये पूर्वपरिस्थिती लागू करावी, अशी मागणी राष्ट्रांचने केली आहे.स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी आपल्या भाषणात जम्मू आणि काश्मीरबद्दल काही महत्त्वपूर्ण घोषणा कराव्यात, अशी मागणीही यशवंत सिन्हा यांनी केली आहे. त्यात २०२१ वर्ष संपण्यापूर्वी जम्मू आणि काश्मीर राज्याला पुन्हा संपूर्ण राज्याला दर्जा परत देणे, संपूर्ण राज्याचा दर्जा पुन्हा बहाल केल्यावर मुक्त आणि मोकळ्या वातावरणात विधानसभा निवडणूक, मतदारसंघांच्या पुनर्रचनेची सध्या सुरू असलेली प्रक्रिया लांबणीवर टाकावी आणि देशाच्या अन्य राज्यांबरोबर ही प्रक्रिया करावी, राज्याचे सध्याचे स्वरूप बदलण्यासाठी पावले उचलू नयेत या मागण्यांचा समावेश आहे. दहशतवाद, धार्मिक तुष्टीकरणाचे राजकारण आणि वेगळेपणाची भावना हे समान शत्रू असून त्यांचा सर्वांनी एकत्रित सामना करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे.
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
Comments
Post a Comment