लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या वादात पडणार नाही – अण्णा हजारे


लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या वादात पडणार नाही – अण्णा हजारे

लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या वादात पडणार नाही – अण्णा हजारे

लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या वादात मला पडायचे नाही, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले.


लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या वादात मला पडायचे नाही, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले. तहसीलदार ज्योती देवरे यांनी महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींवर आरोप करीत आत्महत्या करण्याचा इशारा ध्वनिफितीद्वारे दिला होता.या पार्श्वभूमीवर आमदार नीलेश लंके यांनी शनिवारी हजारे यांची भेट घेऊन श्रीमती देवरे यांच्या गैरव्यवहाराच्या चौकशीचा अहवाल दाखवला. श्रीमती देवरे यांनी रविवारी हजारे यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली.आपण कोणताही गैरव्यवहार केलेला नाही. मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे,मात्र राज्य पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी व्हावी, अशी अपेक्षा तहसीलदार देवरे यांनी हजारे यांच्या भेटी दरम्यान व्यक्त केली.

आमदार नीलेश लंके व तहसीलदार ज्योती देवरे या दोघांचेही म्हणणे आपण ऐकून घेतले. मात्र मला या वादात पडायचे नाही. हा प्रशासकीय चौकशीचा भाग आहे,असे हजारे यांनी स्पष्ट केले आहे.

तहसीलदार देवरे यांनी आत्महत्येचा विचार बोलून दाखवल्याने हजारे यांनी नाराजी व्यक्त केली. एवढा टोकाचा निर्णय का घेतला, काम करताना अडचणी येणारच पण खचून जाण्यात अर्थ नाही. सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर नेहमीच आरोप होतात, त्यांच्यापुढे अडचणी निर्माण केल्या जातात.मात्र ते खचले नाहीत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करा असा सल्ला हजारे यांनी देवरे यांना दिला.

रक्षाबंधन असल्याने आपण त्यांना राखी बांधली. हजारे यांनीही आपले म्हणणे ऐकून घेतले.आत्महत्येचा विचार करणे योग्य नाही. तो डोक्यातून काढून पुढील वाटचाल करा असे सांगत संघर्ष करण्याचा,लढण्याचा सल्ला दिला. असे असतानाही मला हजारे यांनी भेट नाकारली,मला हुसकावून दिले अशा अफवा पसरवण्यात आल्या. त्यामुळे मनस्ताप झाला.मी एक महिला अधिकारी असल्याने मला त्रास देण्यात येत असल्याचे वाईट वाटते,असे तहसीलदार देवरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

प्रातिनिधिक व्यथा

एका विशिष्ट मन:स्थितीत मी नैराश्याच्या गर्तेत गेले होते.त्या दहा मिनिटात माझ्या मनात आत्महत्येचे विचार आले.मात्र ध्वनिफीत तयार करताना मन मोकळे झाले.आत्महत्येचा विचार बाजूला सारला,लढायचे ठरवले.महिला आयोगाच्या सदस्या अनिता पाटील, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी माझे चांगल्या प्रकारे समुपदेशन केले.ध्वनिफितीत मी कोणाचेही नाव घेतलेले नाही.कार्यकारी पदावर काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांच्या व्यथा मी प्रातिनिधिक स्वरूपात मांडल्या आहेत.

ज्योती देवरे, तहसीलदार पारनेर.

....................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या

news.mangocity.org