मदत योजना ग्रामीण लोककलावंतांपर्यंत पोहचण्याची गरज


मदत योजना ग्रामीण लोककलावंतांपर्यंत पोहचण्याची गरज

मदत योजना ग्रामीण लोककलावंतांपर्यंत पोहचण्याची गरज

योजनेच्या अंमलबजावणीकडे लक्ष

महाराष्ट्र: राज्यातील लोककलावंतांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच हजार रुपये मदत देण्याचे जाहीर करण्यात आल्याने अनेक ज्येष्ठ कलावंतांना दिलासा मिळाला आहे. करोना संकटात लोककलावंतांचे अधिक हाल झाल्याने सरकारच्या या मदत योजनेचे सध्या तरी सर्वत्र स्वागत होताना दिसत आहे. लोककलेचा आणि लोकसाहित्याचा वारसा जीवापाड जपणाऱ्या ग्रामीण भागातील लोककलावंतांवर करोनामुळे हलाखीची वेळ आली. आपल्या कलेची शिदोरी हाती घेत गावोगावी फिरताना अनेक ठेचा त्यांना सहन कराव्या लागत आहेत. यामुळे त्यांच्या कुटुंबाचे हाल होत असून मदत योजनेमुळे हे हाल काहीअंशी कमी होतील. त्यामुळे या योजनेची अंमलबजावणी योग्य प्रकारे व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त के ली जात आहे.

नागरी भागात जसे विविध क्षेत्रात काम करणारे कलाकार आहेत, तसे ग्रामीण भागातही लोककलावंत आहेत. कलगीतुरा, तारफा नृत्य, मादोळ, बैठी लावणी, संबळ कला, वाजंत्री, परशरामपुरी, कनाती, तमाशे, बोहाडे, विणेकरी, भजनी वादक,  गायक, सनई वादक, तुतारी वादक, सोंगाडय़ा, शाहीर, पोवाडे, ढाका, ढोल नाच, वगनाटय़, लेखक, कीर्तनकार, प्रवचनकार यांची नोंद लोककलावंतांमध्ये होईल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ग्रामीण लोककलेला पिढीजात दर्जा असून आज या कला कालबाह्य़ होण्याच्या मार्गावर आहेत. अशा जुन्याजाणत्या कलाकारांना जर कला टिकवायच्या असतील तर त्यांना मानधन मिळणे गरजेचे आहे.

पेठ तालुक्यातील ताराबाई बागूल यांनी याविषयी म्हणणे मांडले. चार दशके लोककलेसाठी काम के ले. संस्थेच्या द्वारे अनेक कलाकारांना मानधन मिळवून दिले. परंतु, आज शासनाचे निकष हे जाचक असल्याने या योजनेपासून ग्रामीण आदिवासी भागातील कलाकार दूर राहतील, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. दिग्दर्शक माया खोडवे यांनी आपली व्यथा मांडली. मी अतिशय गरीब कुटुंबातील मजूर आणि कचरा वेचणारी महिला. माझ्यातील कलागुणांना दृकश्राव्य कल्पकतेची जोड मिळाली.

समाजात नाडलेल्या, वंचित लोकांच्या मुद्दय़ांवर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न के ले. ग्रामीण भागात लोककलेचा मोठा वारसा आहे. त्यांची परिस्थिती दयनीय आहे. मजुरी करणारे हे कलावंत शासकीयदृष्टय़ा पूर्ण नाकारले गेले आहेत. सामाजिकदृष्टय़ा त्यांना आधार नाही. करोनात आम्ही दुर्गम पाडय़ावर १५० विधवा भगिनी, ५१ कलावंतांना किराणा, मुखपट्टी आणि साबण वाटले. आजच्या काळात नाटय़ आणि चित्रपट क्षेत्रातील कलाकार हे सजग असून राज्य सरकारच्या योजनेचा त्यांना लाभ मिळेल, परंतु नाशिकच्या १५ तालुक्यात ग्रामीण लोककलेविषयी किती जणांना माहिती आहे. ग्रामीण भागातील कलाकारांमध्ये उच्च दर्जाचे कलागुण आहेत. करोना संकटाच्या निमित्ताने शासनाने दिलेली पाच हजार रुपयांची मदत अशा ग्रामीण लोककलावंतांपर्यंत पोहचण्याची गरज असल्याचे त्यांनी मांडले.

....................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या

news.mangocity.org