आपल्या माणसासाठी आपले कर्तव्य ! कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठाणचा अभिनव उपक्रम

रत्नागिरी - राज्यात ओढवलेल्या पूरस्थितीचा तडाखा कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला बसला. कोकणात मोठ्या प्रमाणात हानी झाली. दरडी कोसळून निष्पाप लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कोकण विभाग म्हादे परिवार संलग्न, कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठाण मुंबईने ही बाब विचारात घेत, 'आपल्या माणसासाठी आपले कर्तव्य' हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. दोन दिवस हे उपक्रम कोकणासह तळकोकणात राबवले जाणार आहे. शनिवारी चिपळूण- खेड तालुक्यातील केळणे आणि पोसरे तर रविवारी संगमेश्वर तालुक्यातील खडीकोळवण गावातील नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या नागरिकांना सेवाभावी वृत्तीतून अन्नधान्य किट, मुला- मुलींना कपडे, महिलांसाठी साड्या, वयोवृद्धांसाठी मदत करण्यात आली.
जुलै महिन्यात धो- धो बरसलेल्या पावसाने मुंबईसह राज्याची दाणादाण उडवली. घरांची पडझड, झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. अनेक पूरस्थिती निर्माण झाल्याने रस्ते, पूल पाण्याखाली गेले. दरडी कोसळून गावे जमिनीखाली गाढली गेली. महाडमधील तळीये, चिपळूण तालुक्यातील पोसरे गावात मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली. तर केळणे गावात ३० कुटुंब थोडक्यात बचावली. पोसरे गावातील ग्रामस्थांचे अलोरे येथील पाटबंधारे विभागाच्या घरांमध्ये तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठाण मुंबईच्यावतीने दोन्ही ठिकाणच्या नागरिकांना मदतीचा हात पुढे करण्यात आला. संगमेश्वर तालुक्यातील खडीकोळवण गावातही मदत देण्यात आली. गगनगिरी सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल जाधव यांचे यासाठी मोठे सहकार्य लाभले. दरम्यान, मंडळाचे अध्यक्ष संदीप म्हादे, उपाध्यक्ष संजय म्हादये, सेक्रेटरी काशिनाथ म्हादे, खजिनदार सत्यवान म्हादये, दिपक म्हादये (गाव- भू पेंडखळे), उमेश म्हादे (गाव- तळसर), रविंद्र म्हादे (गाव- बोरंगाव), अनंत म्हादे (गाव- शेंबवणे) आणि दर्शन दादा, केळणे व पोसरे गावचे रहिवासी यावेळी उपस्थित होते.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
Comments
Post a Comment