दिपाली भोसले सय्यद चारीटेबल ट्रस्टच्या वतीने सांगलीतील पूरग्रस्त १००० मुलींच्या लग्नासाठी ५ कोटीची तरतूद

 


दिपाली भोसले सय्यद चारीटेबल ट्रस्टच्या वतीने  सांगलीतील पूरग्रस्त   १००० मुलींच्या लग्नासाठी ५ कोटीची तरतूद


पूरग्रस्त १000 मुलीच्या नावे ठेवणार 50 हजाराची मुदत ठेव

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता


रत्नागिरी प्रतिनिधी

(रमजान गोलंदाज)

                        मुंबईतील दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्ट कडून पूरग्रस्तांना वेळोवेळी अनेक प्रकारे मदत करण्यात आली आहे. कोकणामध्ये आलेल्या पुरामध्ये ही दीपाली सय्यद चारीटेबल ट्रस्ट च्या वतीने अनेक पूरग्रस्तांना मदत पोहोचवली गेली आहे. वेगवेगळे सामाजिक उपक्रम या ट्रस्टच्या मार्फत केले जातात. मात्र दिपाली भोसले सय्यद यांच्या संकल्पनेतून आलेले नवीन उपक्रम म्हणजे सांगली जिल्हा मध्ये आलेल्या महापुरा मध्ये गरीब कुटुंबातील एक हजार मुलींचे करण्याचे दृष्टीने  दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सांगली इथं 1000 पूरग्रस्त मुलींच्या नावे 50 हजार रुपयांचे मुदत ठेवण्यात येणार आहे.. महापुरा मध्ये अनेकांचे घरं उद्ध्वस्त झाली असून अनेक कुटुंब रस्त्यावर आली आहेत त्यामध्ये येथील जिल्ह्यातील अनेक मुलींचे लग्न ठरले होते मात्र पुराच्या भयभीत अवस्थेमुळे त्या लग्नसमारंभाला अडथळा निर्माण झाले होते. याची जाणीव लक्षात घेऊन दिपाली भोसले चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सांगली येथे एक हजार गरीब कुटुंबातील मुलींचे लग्न करण्यासाठी   मुलींच्या नावे प्रत्येकी पन्नास  हजार रुपयाची मुदत ठेवण्यात येणार आहे. हा कार्यक्रमातला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी उपस्थित राहावे यासाठी दिपाली भोसले सय्यद यांनी अजित दादा पवार यांची भेट घेऊन त्यांनी या उपक्रमाची माहिती त्यांना दिली.हा  कार्यक्रम सप्टेंबर महिन्यामध्ये होणार असून या कार्यक्रमाला सर्व कोविल्डचे शासकीय नियम पाळून  करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कौतुक केले असून या उपक्रमाला अजितदादा पवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

            अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात केल्या जात असलेल्या वेगवेगळ्या उपक्रम आणि सामाजिक कार्याचे कौतुक उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले आहे. मुलींचे कुटुंब उभे करण्याची जबाबदारी दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने घेतली गेली असून या गरीब मुलींच्या लग्नाची सर्वस्वी जबाबदारी अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद यांनी आपल्या ट्रस्टच्यावतीने घेतले आहे त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे सांगलीतील लोकांनी कौतुक केले असून अनेक मुलींचे संसार नांदण्यासाठी चारीटेबल ट्रस्ट पुढे आले असून याचा फायदा गरीब भागातील मुलींचा होणार आहे.आणि अनेक संसार उभे राहणार आहेत.  दिपाली भोसले सय्यद यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत सांगलीतील अनेक लोकांनी केले आहे आणि त्यांच्या कार्याची सुद्धा कौतुक केले आहे.

....................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या

news.mangocity.org