केरळसह महाराष्ट्रात रात्रीच्या संचारबंदीची केंद्राची सूचना

 


केरळसह महाराष्ट्रात रात्रीच्या संचारबंदीची केंद्राची सूचना

केरळसह महाराष्ट्रात रात्रीच्या संचारबंदीची केंद्राची सूचना


नवी दिल्ली : केरळमधील रुग्णवाढीबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. केरळबरोबरच दुसऱ्या क्रमांकाची दैनंदिन रुग्णवाढ नोंदवणाऱ्या महाराष्ट्रातील जास्त संसर्गदर असलेल्या भागांत रात्रीची संचारबंदी लागू करण्याची सूचना केंद्राने गुरुवारी केली.

राज्यांनी लसीकरण मोहिमेला वेग दिला पाहिजे, त्यासाठी अधिक लसमात्रांची गरज असेल तर तातडीने केंद्राकडून अपेक्षित लसमात्रा राज्यांना पुरवल्या जातील, असे केंद्रीय गृहसचिवांनी राज्य प्रशासनाला सांगितले. तसेच, करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले पाहिजे व सणासुदींच्या दिवसांमध्ये सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी टाळली पाहिजे, असेही केंद्र सरकारने राज्यांना स्पष्ट केले.

केरळमध्ये सलग दोन दिवस ३० हजारांहून जास्त रुग्णांची भर पडली असून, एक लाख रुग्ण उपचाराधीन आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू व आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये १० हजार ते एक लाखापर्यंत रुग्ण उपचाराधीन आहेत. एकूण उपचाराधीन रुग्णांपकी ५१ टक्के रुग्ण केरळमध्ये आहेत. महाराष्ट्रात १६ टक्के व अन्य तीन राज्यांमध्ये ४-५ टक्के उपचाराधीन रुग्ण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली. केरळ आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये उपचाराधीन रुग्णांची संख्या अन्य राज्यांच्या तुलनेत अधिक असल्याने केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी दूरचित्रसंवादाद्वारे राज्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला.

देशातील ४१ जिल्ह्यांमध्ये १० टक्क्यांपेक्षा जास्त संसर्गदर असून, करोनाची दुसरी लाट अजूनही कायम आहे. करोनासंदर्भातील नियमांचे पालन केले जात नसल्याने करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) महासंचालक बलराम भार्गव यांनी दिली. केरळ व महाराष्ट्राने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुलनेत अधिक प्रतिबंधात्मक उपाय योजण्याची गरज असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने निदर्शनास आणून दिले. या आढावा बठकीला निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉलही उपस्थित होते.

..................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या

news.mangocity.org