प्राणी दत्तक योजनेला उत्स्फुर्त प्रतिसाद !

 

प्राणी दत्तक योजनेला उत्स्फुर्त प्रतिसाद !

प्राणी दत्तक योजनेला उत्स्फुर्त

 प्रतिसाद !

मुंबई : ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातर्फे  राबवल्या जाणाऱ्या प्राणी दत्तक योजनेला नागरिकांनी उत्स्फु र्त प्रतिसाद दिला असून प्राण्यांच्या संख्येपेक्षा इच्छुक प्राणीपालकांची संख्या जास्त आहे.

राष्ट्रीय उद्यानात ५ वाघ, १३ बिबटे आणि २ सिंह आहेत. त्यांच्यासाठी अनुक्रमे ७, १४ आणि ३ अर्ज आले आहेत. यापैकी ८ बिबटे आणि २ वाघ काही महिन्यांपूर्वीच दत्तक घेतले गेले आहेत. ३ वाघाटींसाठी (रस्टी स्पॉटेड कॅ ट) ५ अर्ज आले आहेत. ३ नीलगाय, ९ भेकर (बार्किं ग डिअर) आणि ३५ हरिणे या सर्वांसाठीही अर्ज आले आहेत. वाघ आणि सिंह गेल्या २ वर्षांपासून दत्तकत्वाच्या प्रतीक्षेत होते. प्राणी दत्तक घेणाऱ्यांना त्यासंबंधीचे प्रमाणपत्र दिले जाते आणि ते प्राण्याच्या पिंजऱ्यावरही लावले जाते. दर १५ दिवसांनी संबंधित प्राण्याला काही अंतरावरून पाहण्याची संधी त्याच्या आर्थिक पालकांना दिली जाते. किमान एका वर्षासाठी प्राण्यांचे आर्थिक पालकत्व घेता येते. सामाजिक कार्यकत्र्या साधना वझे ८ वर्षांपासून अर्जुन या बिबट्याला दत्तक घेत आहेत. डिसेंबर २०१३ पासून ही योजना सुरू झाली. यामुळे  प्राण्यांच्या संगोपनाच्या खर्चाला हातभार लागत आहेच; शिवाय नागरिकांनाही वन्यजीवांविषयीचे प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळते. प्रारंभी या योजनेला फारशी प्रसिद्धी देण्यात आली नव्हती. त्यामुळे रामदास आठवले, प्रताप सरनाईक यांच्यासारखे राजकारणी, सुमीत राघवन यांच्यासारखे अभिनेते अशा काही नामवंत मंडळींनी  प्राणी दत्तक घेतले; मात्र  सर्वसामान्यांना   योजनेची माहिती व्हावी यासाठी काही दिवसांपूर्वी पुन्हा परिपत्रक काढण्यात आले. नव्या अर्जांमध्ये सामान्य प्राणीप्रेमींसह दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्यासारख्या नामवंत मंडळींचाही समावेश आहे.

प्रत्येक प्राण्यासाठी येणाऱ्या एकू ण खर्चाच्या ३५ ते ४० टक्के च खर्च दत्तक योजनेतून घेतला जातो. उदाहरणार्थ – एका वाघासाठी केवळ मटणाचा वार्षिक खर्च ५ लाख रुपये आहे. त्यासोबतच त्याचा पिंजरा, साफसफाई, आवश्यक कर्मचारी हे सर्व मिळून एकू ण ८ ते १० लाख रुपये वार्षिक खर्च वाघासाठी येतो. दत्तक योजनेतून ३ लाख १० हजार रुपये घेतले जातात. – विजय बारब्दे, वनपरिक्षेत्र अधिकारी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

.....................................
------------------------------

www.freshnewz.in


Comments