चढय़ा दराचा ‘दुग्ध-शर्करा’ योग!

चढय़ा दराचा ‘दुग्ध-शर्करा’ योग!
साखरेचे दर पाच रुपयांनी तर दूध खरेदी दरातही वाढ
बंदरपोच साखर विक्रीचा दर आता ३१५० रुपये क्विंटल रुपयांपर्यंत गेला असून कच्च्या साखरेचा दरही आता ३१०० रुपयांपर्यंत वाढला आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने अनुदान दिल्यानंतरही साखरेचे दर २६०० ते २७०० रुपयांपर्यंत होता. तो आता वाढू लागला असून मागणी वाढू लागल्याने पुढील हंगामातील वायदेबाजारही तेजीत आहे. दर सुधारल्याने गेली तीन वर्षे अडचणीत असणाऱ्या साखर कारखानदारीच्या आशा वाढल्या आहेत. पुढील वर्षांत ३१० लाख टन साखर उत्पादक होईल असा अंदाज आहे. राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर वाढत जातील असे संकेत आहेत. ब्राझीलमधील दुष्काळामुळे आता साखरेचे दर चढेच राहतील. बंदरपोच साखरेची किंमत वाढलेली असून निर्यातही वाढेल. तसेच साखर, इथेनॉल या उत्पादनाचे भाव तेजीत आहेत.’ केवळ साखरच नाही तर हळद आणि सोयाबीनचेही दर वाढत असल्याचे दिसून आले आहे. या वर्षी साखरेचे दर चढे असल्याने आजारी साखर कारखानेही सुरू करण्यासाठी कारखानदार प्रयत्न करणार आहेत.
हळकुंडाची प्रत लक्षात घेता किमान ४ हजार ५०० ते कमाल ६ हजार ५०० रुपयापर्यंत वाढ होत असून त्यात प्रतिक्विंटल ५०० रुपयांची वाढ झाली आहे. मराठवाडय़ात हिंगोली जिल्ह्य़ात हळदीची मोठी बाजारपेठ आहे.
गेल्या काही वर्षांत शेतमालाचे दर हा चिंतेचा विषय असतो. पण आता परिस्थिती बदलू लागली असल्याचे चित्र आहे. दूध मागणीही आता करोना पूर्व स्थितीमध्ये आली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी खासगी दूध संघामार्फत २३ लिटपर्यंतच खरेदी होती. तो दर आता २५ रुपयांपर्यंत वाढला आहे.
– बी. बी. ठोंबरे, नॅचरल शुगरचे प्रमुख
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा