नॅशनल इन्शुरन्स कंपनीला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका


नॅशनल इन्शुरन्स कंपनीला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका

नॅशनल इन्शुरन्स कंपनीला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका

नागपूर : देशातील सर्वात जुन्या आणि मोठय़ा अशा नॅशनल इन्शुरन्स कंपनीला करोना काळात मोठा फटका सहन करावा लागला. करोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल ते जुलै या चार महिन्यात ग्राहकांनी  मासिक हप्ते वेळेत न भरल्याने महाराष्ट्रात तब्बल ३५२ कोटींची तूट निर्माण झाली.

करोनाच्या पहिल्या लाटेत अर्थात २०१९-२० मध्ये एप्रिल ते जुलै या दरम्यान या कंपनीत महाराष्ट्रातून ८७८ कोटी रुपयांचे हप्ते जमा होत होते. मात्र करोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसला. त्यामुळे अनेकांनी विम्याचे हप्ते  भरले नाही. दुसऱ्या लाटेत याच कालावधीत केवळ ५२२ कोटी रुपयांचे हप्ते जमा झाले. त्यामुळे  ३५६ कोटी रुपयांची तूट यादरम्यान निर्माण झाली.  देशात २०१९-२० मध्ये एप्रिल ते जुलै या कालावधीत ४ हजार ६३८ कोटी रुपये हप्त्यांच्या स्वरूपात नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडे जमा होत होते. मात्र दुसऱ्या लाटेत म्हणजे २०२०-२१ मध्ये ३ हजार ९३३ कोटी रुपये नागरिकांनी जमा केले.  याशिवाय न्यू इंडिया इन्शुरन्स,ओरिएंटल इन्शुरन्स व युनायटेड इंडिया इन्शुरन्स या कंपन्यादेखील करोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रभावित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

.....................................
------------------------------

www.freshnewz.in

Comments