मिठी नदीत जाणारे मलजल रोखण्यासाठी बोगदा

मिठी नदीत जाणारे मलजल रोखण्यासाठी बोगदा
मुंबई : कुर्ला येथील दोन नाल्यांमधून मिठी नदीत सोडण्यात येणारे मलजल धारावी मलजल केंद्रात वळविण्यासाठी ६.७ किलोमीटर लांबीचा बोगद्याचे बांधकाम करण्यात येणार असून त्यासाठी सुमारे ५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. निविदा प्रक्रियेस लागलेल्या ११ महिन्यांच्या विलंबामुळे खर्च वाढला आहे. या प्रकल्पाबाबत आणखी अभ्यास करण्याची गरज असल्याचे कारण पुढे करीत स्थायी समितीने हा प्रस्ताव राखून ठेवला.मिठी नदीच्या शुद्धीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला असून नदीकाठी काही ठिकाणी मलजल शुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहेत. कुर्ला येथील सफेद पूल नाला आणि बापट नाल्यातील मलजल थेट मिठी नदीत जाते. हे मलजल रोखण्यासाठी ६.७ किलोमीटर लांबीचा बोगदा बांधण्यात येणार आहे.
वादग्रस्त कंत्राटदाराला संधी
रस्ते घोटाळ्यात गुंतलेल्या कंत्राटदाराला काळ्या यादीतील कालावधी कमी करून दंडाची रक्कम वाढवून प्रशासनाने पालिकेचे दरवाजे खुले करण्यात आले आहेत. पालिकेच्या रस्ते दुरुस्तीच्या कामांमध्ये २०१६ मध्ये घोटाळा झाला होता.रस्ते दुरुस्तीच्या निकषांचे पालन न केल्याचा ठपका काही कंपन्यांवर ठेवण्यात आला होता. त्यापैकी एक असलेल्या जे. कुमार कंपनीचे नाव सात वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्यात आले होते. मात्र या कंपनीने न्यायालयात धाव घेत पालिकेच्या निर्णयाला आव्हान दिले होते. त्यानुसार पालिकेने जे. कुमार कंपनीचा काळ्या यादीतील कालावधी तीन वर्षांवर आणला आणि दंडाची रक्कम वाढविली. या नव्या निर्णयानुसार कंपनीचा काळ्या यादीतील कालावधी २०१९ मध्ये संपुष्टात आला. रस्ते दुरुस्तीचे निकष धुडकावणाऱ्या या कंपनीला महत्त्वाची कामे देण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात या कामांच्या दर्जाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे, असा आरोप भाजप नगरसेवक विनोद मिश्रा यांनी केला आहे.
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
Comments
Post a Comment