गतिमान अर्थचक्रासाठी उपायांवर चर्चा


गतिमान अर्थचक्रासाठी उपायांवर चर्चा

गतिमान अर्थचक्रासाठी उपायांवर चर्चा

महाराष्ट्र हे देशातील औद्योगिकदृष्ट्या सर्वांत प्रगत राज्य म्हणून ओळखले जाते.

मुंबई : करोनाकाळात बिघडलेले अर्थचक्र  हळूहळू गतिमान होत असताना औद्योगिक प्रगती आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये होणाऱ्या बदलांचा परामर्श घेण्याच्या उद्देशाने  ‘इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह’ आयोजित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन; तसेच टाटा स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक टी. व्ही. नरेंद्रन यांच्यासह उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज, विश्लेषक, कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) या उद्योगपती-उद्योजकांच्या संघटनेचे सदस्य सहभागी होत आहेत.

महाराष्ट्र हे देशातील औद्योगिकदृष्ट्या सर्वांत प्रगत राज्य म्हणून ओळखले जाते. देशातील औद्योगिक उत्पादनाच्या १५ टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते आणि या क्षेत्रातून मिळणाऱ्या एकूण महसुलापैकी जवळपास ४० टक्के महसूल हा महाराष्ट्रातून मिळतो. स्वातंत्र्यानंतर गेली सात दशके  महाराष्ट्राने विविध उद्योगांच्या विकासाचे सारथ्य केले. अनेक मोठे उद्योग-हजारो लघु व मध्यम उद्योग व त्यात काम करणारे लाखो अधिकारी-कर्मचारी असा महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राचा विस्तार आहे. करोनाच्या काळात आता अर्थचक्र पुन्हा रुळांवर आणण्यासाठी राज्य सरकार उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करत आहे आणि उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्या कोणत्या व त्यावर उपाय काय या अनुषंगाने गुरुवारी २६ तारखेला आयोजित करण्यात आलेल्या ‘ इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह- २०२१’मध्ये चर्चा होणार आहे. उद्योगउभारीसाठी महाराष्ट्र शासन आखत असलेली धोरणे, नवउद्योगनिर्मितीसाठी आणि व्यापारवृद्धीसाठी असलेले महाराष्ट्राचे अनन्यसाधारण स्थान याविषयी सरकारच्या वतीने सविस्तर माहिती सादर केली जाईल. एक लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था उभी करण्यासाठी काय आवश्यक आहे याविषयी उद्योगधुरीणांकडून सूचना, पायाभूत सुविधांच्या स्थितीचा सविस्तर आढावा असे या बहुसत्रीय कॉन्क्लेव्हचे स्वरूप आहे.

....................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या

news.mangocity.org