गांधीनगरमधील एटीएम फोडल्याप्रकरणी तीन चोरट्यांना अटक


Crime-News
Advertisement

गांधीनगरमधील एटीएम फोडल्याप्रकरणी तीन चोरट्यांना अटक

कोल्हापूर: एटीएम फोडल्याप्रकरणी गांधीनगर पोलिसांनी तिघा चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून आणखी गंभीर गुन्हे उघडकीस येतील, अशी माहिती करवीरचे पोलीस उपाधीक्षक आर. आर. पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली. कोल्हापूर शेजारी असलेल्या गांधीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उचगाव चौकातील एका बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणी गांधीनगर पोलिसांनी सचिन दत्तात्रय गवळी, चंद्रकांत शशिकांत तळकर, राहुल राजेश माने या तिघांना अटक केली. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांच्या बॅटरी काढून घेणे, एटीएम फोडण्याचा प्रयत्न, राजेंद्रनगर येथील चोरी आदी गुन्हे केल्याची त्यांनी कबुली दिली आहे. गवळी याच्यावर खून, दरोडे, जबरी चोरी, घरफोडी, विनयभंग अशा प्रकारचे १५ गुन्हे दाखल असल्याचे पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर, उपनिरीक्षक सुनील माने यांनी सांगितले.

.....................................
------------------------------

www.freshnewz.in


Comments