राजापूर तालुक्यातील पाचल ग्रामपंचायतीमध्ये जमीन वाचवा अभियान व बांबूची लागवड या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन


 राजापूर तालुक्यातील पाचल ग्रामपंचायतीमध्ये जमीन वाचवा अभियान व बांबूची लागवड या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन


रत्नागिरी प्रतिनिधी:-

जागतिक वातावरणातील बदलांमुळे निसर्गाचे, मानवाचे व जीवसृष्टीचे प्रचंड नुकसान होत आहे. याला कारणीभूत मानवाचा स्वार्थ व त्यासाठी वापरलेली धोरणे आहेत. या दृष्टीने निसर्गाचे सर्वदूर जतन करणे हाच त्याच्यावर पर्यायी उपाय आहे. त्यासाठी जमीन वाचवा अभियान व बांबूची लागवड हे चांगले पर्याय आहेत. ही लोकचळवळ व्हावी यासाठी वसुंधरा प्रतिष्ठान या संस्थेमार्फत काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानिमित्ताने शेतकऱ्यांना एकत्रित करण्यासाठी श्री पांडुरंगाच्या प्रतिमेचे पूजन होणार आहे. त्यावेळी जमीन वाचवा अभियानाचे महत्व समजावून देण्यासाठी दिनांक २९ ऑगस्ट २०२१ रोजी राजापूरातील ग्रामपंचायत पाचल येथे सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत आयोजित केलेला आहे. तरी या पूजेनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये खालील विषयांचे मार्गदर्शन होणार आहे. शेती व पर्यावरण-नारायण सिंग राजपूत, बांबू लागवड - मोहन ज्ञानदेव नारकर, जमीन वाचवा अभियान- रमेश चौगुले ग्रीन प्लॅनेट बायो प्रोडक्टचे कंपनीचे अधिकारी, कृषी विषयक शासकीय योजना- संतोष मदने (पाचल मंडळ कृषि अधिकारी) आदी उपस्थीत राहणार आहेत.

.................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या

news.mangocity.org