मूर्तिकारांचे उत्पन्नाचे गणित बिघडले

मूर्तिकारांचे उत्पन्नाचे गणित बिघडले
उंचीच्या निर्बंधांमुळे कमाईवर पाणी
गणेशोत्सव अवघ्या २५ दिवसांवर आल्यामुळे गणेश कार्यशाळांमध्ये कारागिरांची लगबग सुरू झाली असली तरी नफ्याची गणिते आखताना मूर्तिकारांना कसरत करावी लागत आहे. जागेचे भाडे, कारागिरांचे वेतन, कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती हा खर्च तितकाच असला तरी उंचीच्या मर्यादेमुळे मिळणारा नफा मात्र निम्म्याहून कमी झाल्याची खंत मूर्तिकारांनी व्यक्त केली आहे.
उंच गणेशमूर्तींच्या कार्यशाळेने गजबजणाऱ्या गिरणगावाचे स्वरूप करोनामुळे बदलून गेले आहे. गेल्या दोन वर्षांत येथील कार्यशाळांमध्ये गणेशमूर्ती घडत असल्या तरी पूर्वीचा उत्साह दिसत नाही. उंचीच्या उंचीवरील निर्बंधांमुळे या व्यवसायातून नफा मिळवणे कठीण झाल्याने मूर्तिकारांमध्ये उदासीनता आहे.
जागेचे भाडे आणि मिळणारा नफा याचे गुणोत्तर साधले जात नसल्याने अनेक मूर्तिकारांनी गिरणगावाला निरोप देऊन उपनगरांची वाट धरली आहे. उंच मूर्ती घडवणारे मुर्तिकार सतीश वळीवडेकर यांची पूर्वी लालबाग येथे कार्यशाळा होती. परंतु आर्थिक अडचणींमुळे त्यांनी कांदिवली येथे कार्यशाळा हलवली आहे. ‘मूर्तिकारासाठी गणेशोत्सव हीच दिवाळी असते. वर्षभराची कमाई आम्ही या उत्सवाच्या निमित्ताने करतो. जागेचे भाडे जास्त असले तरी उंच मूर्ती तयार करून नफा मिळवणे शक्य होते. चार फुटांच्या मूर्ती घडवताना जागा, मेहनत तेवढीच लागते. पण त्यातून मिळणारी रक्कम थेट तीनपटीने खाली येते. पूर्वी होणारा लाखोंचा नफा आज हजारांवर आला.’ असे वळीवडेकर यांनी सांगितले.
मंडळांची क्रयशक्ती घटली, पण आमच्या खर्चाचे काय?
करोनामुळे मंडळांची क्रयशक्ती कमी झाल्याने परिस्थितीचा विचार करून आम्हालाही कमी दरात मूर्ती द्याव्या लागतात. पण करोनामुळे मूर्ती व्यवसायासाठी लागणारा क च्चा माल मात्र स्वस्त झालेला नाही. किंबहुना माती, पीओपी, काथ्या, रंग, लाकूड या मूर्तीकामासाठी लागणाऱ्या वस्तूंचे दर पूर्वीच्या तुलनेने वाढले आहेत. शिवाय जागेचे भाडे, कामगारांचे वेतन, वाहतूक खर्च यातही वाढ झाल्याने व्यवसाय करताना नाकीनऊ येत आहेत, अशी व्यथा मूर्तिकार रेश्मा खातू यांनी मांडली.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
Comments
Post a Comment