पदवीविना दवाखाने चालविणाऱ्या पाच बोगस डॉक्टरांना अटक

पदवीविना दवाखाने चालविणाऱ्या पाच बोगस डॉक्टरांना अटक
मुंबई : वैद्यकीय पदवीविना दवाखाने उघडून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या पाच बोगस डॉक्टरांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. केवळ तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावयाची औषधेही हे आरोपी सर्रास देत असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. उपचारांच्या नावाखाली आरोपींकडून सर्वसामान्य नागरिकांची कित्येक वर्षांपासून लूट सुरू होती. शिवाजीनगर आणि गोवंडी भागातील दोन किलोमीटरच्या परिघात हे दवाखाने गेल्या अनेक वर्षांपासून राजरोजपणे सुरू होते. याप्रकरणी पोलिसांनी मेहताब अहमद अनुरूल हसन (४८), नगेंद्र मिश्रा (४८), मोहमद याकुबदार घुरी इद्रीसी (४३), मोहमदशफी रहिमतुल्ला आलम (५३) आणि कासीम अकील खान (५१) यांना अटक केली.
गोवंडीतील आलिशा क्लिनिक, मिश्रा क्लिनिक, असिफा क्लिनिक, रेहमत क्लिनिक, क्षमा क्लिनिक या दवाखान्यात कोणत्याही वैध पदवीविना नागरिकांवर उपचार केले जात आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ६ चे पोलीस निरीक्षक हनमंतराव ननावरे यांना खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यानुसार त्यांनी एम-पूर्व विभागाच्या साहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया कोळी यांच्या नेतृत्वाखाली पाच डॉक्टरांचे पथक नेमले. या पथकाने एकाच वेळी या दवाखान्यांवर छापा मारला. यावेळी आरोपींकडे कोणताही अधिकृत वैद्यकीय परवाना, तसेच महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र सापडले नाही, अशी माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे यांनी दिली. पोलिसांनी दवाखान्यातून अॅन्टिबायोटिक गोळ्या, विविध इंजेक्शन आणि औषधे जप्त केली आहेत. यातील एक दवाखाना गेल्या २१ वर्षांपासून सुरू होता. तर दोन दवाखाने १५ वर्षांपासून, एक दवाखाना १० वर्षांपासून आणि अन्य एक दवाखाना ४ वर्षांपासून सुरू होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. हे आरोपी मूळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा