साथीच्या आजारांबाबत यंत्रणा दक्ष

साथीच्या आजारांबाबत यंत्रणा दक्ष
ठाणे : गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या वातावरण बदलांमुळे सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. साथीच्या आजारांनी डोके वर काढल्याने पालिका यंत्रणा सतर्क झाली असून त्यांनी साथ आजार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबरोबर नागरिकांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. ताप, डेंग्यू, लेप्टो तसेच इतर आजारांची लागण झाली तर, तात्काळ महापालिकेच्या रुग्णालयात किंवा आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये करोनाची दुसरी लाट ओसरली असून शहरामध्ये दररोज ३० ते ४० रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे शहरात करोनाची परिस्थिती आटोक्यात असल्याचे चित्र आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून ऊन आणि पाऊस सुरू असून यामुळे वातावरणात मोठे बदल झाले आहेत.
या बदलांमुळे ताप, सर्दी, खोकलाआणि डोकेदुखीच्या रुग्णांची दवाखान्यांबाहेर गर्दी वाढू लागली आहे. त्याचबरोबर डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टोचे रुग्णही आढळून येत आहेत. या रुग्णवाढीनंतर महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून त्यांनी साथीचे आजार रोखण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून परिसरात धूर तसेच औषध फवारणी सुरू करण्यात आली आहे.
सात दिवसांपेक्षा जास्त दिवस साठविलेल्या किंवा साचलेल्या पाण्यात, धुणी-भांडी करण्यासाठी वापरण्यात येणारे पाण्याचे िपप, घराच्या आसपास पडलेल्या नारळाच्या करवंटय़ा, बांधकामासाठी वापरण्यात येणारे पाण्याचे हौद, सोसायटय़ांच्या झाकण नसलेल्या टाक्या, यामध्ये डासांची निर्मिती होऊन त्यापासून मलेरिया होऊ शकतो, असे पालिकेने म्हटले आहे. तसेच साथ आजाराचे रुग्ण वाढू नयेत म्हणून पालिकेने नागरिकांनाही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.
ताप, डेंग्यू, लेप्टो तसेच इतर आजारांची लागण झाली तर, तात्काळ महापालिकेच्या रुग्णालयात किंवा आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करण्याचे आवाहन पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा आणि महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे. तसेच घरातील किंवा परिसरातील व्यक्तींना हिवताप, डेंग्यू, कावीळ, हगवण, विषमज्वर (टायफॉइड), लेप्टोस्पायरोसिस अशा साथीच्या आजारांचे रुग्ण आढळून आले तर, त्याबाबत महापालिकेच्या दवाखान्यात किंवा आरोग्य केंद्रात माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. जेणेकरून वेळीच उपाययोजना करून साथीचे आजार रोखणे शक्य होईल, असा दावाही त्यांनी केला आहे.
पाणी टाक्यांची साफसफाई, शिळे पदार्थ खाणे टाळावे, परिसर अधिकाधिक स्वच्छ ठेवावा..
नागरिकांनी पाणी गाळून आणि उकळून प्यावे, पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरिन वापरावे, इमारतीमधील तसेच घरातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या साफ कराव्यात, सध्या येणाऱ्या सणासुदीच्या काळात शिळे, उघडय़ावरील अन्नपदार्थ आणि कापलेली फळे खाऊ नयेत, साचलेल्या पाण्यातून चालणे टाळावे, सात दिवसांपर्यंत पाणी साठवून ठेवू नये, साठविलेल्या पाण्याच्या पिंपावर घट्ट झाकण बसवावे, सोसायटीच्या आवारात, टेरेसवर किंवा घराभोवती नारळाच्या करवंटय़ा, वाहनांचे टायर, रिकामे डबे असल्यास त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी तसेच सांडपाण्याच्या टाक्या त्वरित दुरुस्त करून घेऊन सोसायटीचा परिसर स्वच्छ ठेवावा, अशा सूचना पालिकेने नागरिकांना केल्या आहेत.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा