सर्वोच्च न्यायालयाबाहेर जाळून घेण्याचा प्रयत्न केलेल्या तरुणीचा मृत्य


सर्वोच्च न्यायालयाबाहेर जाळून घेण्याचा प्रयत्न केलेल्या तरुणीचा मृत्यू 

सर्वोच्च न्यायालयाबाहेर जाळून घेण्याचा प्रयत्न केलेल्या तरुणीचा मृत्यू 

या तरुणीवर बसपचे खासदार राय यांनी जून २०१९ मध्ये बलात्कार केल्याची तिची तक्रार होती.


नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर १६ ऑगस्ट रोजी एक तरुणी आणि तिच्या मित्राने कथितरीत्या एकमेकांना जाळून जीवन संपविण्याचा प्रयत्न केला होता. यापैकी तरुणीचा मंगळवारी रुग्णालयात मृत्यू ओढवला आहे. या २४ वर्षीय तरुणीने घोसी येथील खासदार अतुल राय यांच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दिली होती. त्यावरून आपला छळ सुरू असल्याचा दावा तिने केला होता.

तिच्यासोबतच्या तरुणाचा शनिवारी उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता. ही तरुणी उत्तर प्रदेशच्या गाझीपूर जिल्ह्यात शिक्षण घेत होती. ती आपल्या २७ वर्षीय मित्रासोबत १६ ऑगस्टला दिल्लीत आली होती. त्या दोघांनी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ अंगावर रॉकेट ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी या घटनेचे फेसबुक लाईव्हवर चित्रीकरण प्रसारित केले होते.

या तरुणीवर बसपचे खासदार राय यांनी जून २०१९ मध्ये बलात्कार केल्याची तिची तक्रार होती. त्यावेळी ती त्यांच्या घरी गेली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता, तसेच राय यांना तुरुंगातही जावे लागले होते. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याला खोटय़ा प्रकरणात गोवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गुन्हा दाखल केला, असे या तरुणीचे म्हणणे होते. आता या प्रकरणात दिल्ली आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी  तपास सुरू केला असला तरी ते ही तरुणी आणि तरुणाचा जाबजबाब मात्र नोंदवू शकले नाहीत.

....................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या

news.mangocity.org