राज्यातील धरणांत जलसाठ्याची तूट कायम

राज्यातील धरणांत जलसाठ्याची तूट कायम
३ हजार २६७ धरणांत ११ टक्के पाणी कमी
महाराष्ट्र: महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला असला तरी अनेक धरणे अजून पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. राज्यात ३ हजार २६९ धरणे असून गेल्या वर्षीच्या तुलनेत अजूनही ११ टक्क्यांची तूट कायम आहे.
राज्यात सर्वदूर चांगला पाऊस झाला. मात्र अजूनही धरणे गेल्यावर्षीची जलसाठ्याची पातळी गाठू शकले नाहीत. पुणे विभाग सोडला तर इतर सर्व ठिकाणी जलसाठ्याची तूट अजूनही कायम आहे.
राज्यात मोठे मध्यम व लघु मिळूण एकूण ३ हजार २६७ धरणे आहेत. गेल्यावर्षी २१ ऑगस्ट रोजी या धरणातील जलसाठा ६९.९१ टक्के होता. मात्र वर्षभरानंतर याच दिवशी हा जलसाठा ५८.५३ टक्के आहे. त्यामुळे ११.३८ टक्क्यांची तूट अजूनही आहे. अमरावती विभागात ४४६ धरणे आहेत. गेल्यावर्षी ६७.१९ टक्के जलसाठा होता. यंदा तो ५४.८८ टक्के आहे. त्यामुळे १२.९८ टक्के तूट आहे.
औरंगाबाद विभागात ९६४ धरणे असून गेल्यावर्षी ५६.५३ टक्के जलसाठा होता यंदा तो ३९.४९ टक्के असून यामध्ये १७.०४ टक्क्यांची तूट आहे. कोकणातही दरवर्षी प्रमाणे चांगला पाऊस झाला असला तरी येथे तूट कायम आहे. मागीलवर्षी कोकण विभागात ८०.५४ टक्के जलसाठा होता यंदा तो ७७.२६ टक्के आहे. ३.२८ टक्क्यांची तूट कायम आहे. नागपूर विभागात गेल्यावर्षी ६७.८६ टक्के जलसाठा होता. यंदा तो ४६.६८ टक्के आहे. येथे २१.१८ टक्के तूट अजूनही कायम आहे. नाशिक विभागात ६४.२१ टक्के जलसाठा गेल्यावर्षी नोंदवण्यात आला होता. यंदा तो ४६.०५ टक्के आहे. १८.२२ टक्क्यांची तूट येथेही कायम आहे. पुणे विभागात मागील वर्षी ७७.५३ टक्के जलसाठा होता. यंदा तो ७२.९४ टक्क्यांवर आला आहे. येथे ४.५९ टक्के तूट कायम आहे.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा