वाढत्या थकबाकी ने महावितरण त्रस्त आता अधिकाऱ्यांवरच कारवाई करण्याचे संकेत

वाढत्या थकबाकी ने महावितरण त्रस्त आता अधिकाऱ्यांवरच कारवाई करण्याचे संकेत
रत्नागिरी:सर्वसामान्य माणसाच्या जिव्हाळ्याची विज पुरवणारी महावितरण कंपनी थकबाकीमुळे मेटाकुटीला आली आहे थकबाकीदार वीज ग्राहकांच्या कडे वारंवार विनवण्या करूनही वीज बिल भरले जात नसल्यामुळे वीज तोडण्याची कठोर कारवाई कराण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून सामान्य कर्मचाऱ्यांपर्यंत वारंवार दिले गेले आहेत. परंतु थकबाकीदारांची संख्या आणि थकीत रक्कम ही वाढतच चालली आहे
निसर्ग चक्रीवादळ त्यानंतर तौक्ते वादळ आणि त्यातच अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरा मध्ये महावितरण कंपनीचे प्रचंड नुकसान झाले. परंतु महावितरणच्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यालय अन्य जिल्ह्यातील कर्मचारी यांच्या सहकार्याने या संकटांवर वेगाने मात करून वीज ग्राहकांना तातडीने वीज पुरवठा पूर्ववत करून दिला होता. परंतु आता वीज ग्राहकांनी वीज भरणा केंद्राकडे पाठ फिरवल्यामुळे वीज तोडण्याची कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत
सद्यस्थितीत रत्नागिरी जिल्ह्याचा आढावा घेतला असता चिपळूण विभागातील 61 हजार 450 वीज ग्राहकांकडे 19 कोटी 12 लाख रुपये खेड विभागातील 45 हजार 297 ग्राहकांकडे 15 कोटी 19 लाख तर रत्नागिरी विभागातील 78 हजार 471 ग्राहकांकडे तब्बल 27 कोटी 94 लाख एवढी वीज बिलाची रक्कम थकली आहे एकूणच रत्नागिरी जिल्ह्यातील 1 लाख 85 हजार 218 वीस ग्राहकांकडे 62 कोटी 26 लाख एवढी प्रचंड रक्कम थकीत झाली आहे . महावितरण कंपनी ही अन्य वीज कंपन्यांकडून वीज विकत घेऊनच ग्राहकाला पुरवत असते या पार्श्वभूमीवर कंपनीच्या डबघाईला आलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे थकबाकीदार वीज ग्राहकांवर कारवाई करणाऱ्या करण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. याच अनुषंगाने झालेल्या शिस्तभंग कारवाईमध्ये नुकतेच वाशिम आणि औरंगाबाद येथील अधीक्षक अभियंता यांना निलंबित करण्यात आले आहे. यामुळे विज देयक थकवणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करण्यामध्ये कोणत्याही प्रकारची कुचराई सहन केली जाणार नाही असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आता रत्नागिरी जिल्ह्यातही वेगाने थकबाकीदारांवर विज तोडण्याची कारवाई करण्यात येईल असे महावितरण कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा