समविचारी मंचच्या 'थाळीनाद' आंदोलनाला यश रखडलेल्या एस.टी.बसस्थानकाच्या कामाला मिळाली गत




समविचारी मंचच्या 'थाळीनाद' आंदोलनाला यश 
रखडलेल्या एस.टी.बसस्थानकाच्या कामाला मिळाली गती

रत्नागिरी:    महाराष्ट्र समविचारी मंचच्या थाळीनाद आंदोलनाला यश आले असून 'हायटेक' बसस्थानकाच्या कामाला सुरवात करण्यात आल्याचे एस.टी.विभागाने जाहीर केले आहे.    

रत्नागिरी एस.टी.बसस्थानकाचे नवीन बांधकाम मागील दोन वर्षे या ना त्या कारणांनी रखडले होते.ऊन,वारा,पाऊस यातून प्रवासी वर्गाची फरफट होत होती.प्रवाशांच्या मनातील खदखद विचारात घेऊन महाराष्ट्र समविचारी मंचने संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी ०२ आँगष्ट रोजी या बसस्थानकासमोर थाळीनाद आंदोलन केले होते.
         या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे समविचारीने 'जैसे थे' परिस्थितीत उभे असलेल्या या अपूर्ण कामासह बसस्थानक संबंधित मंत्री लोकप्रतिनिधी यांना वापरासाठी पुजाविधी करुन सुपूर्त केले होते.
         एस.टी.विभागाने ठेकेदाराला मुदत वाढवून दिली आहे.काही रक्कमही दिली आहे.मध्यंतरी आर्थिक अडचणीतून ठेकेदाराला पैसे देण्यात आलेले नव्हते हे सांगून यापुढे या कामात खंड पडणार नसल्याची ग्वाही दिली आहे.
         समविचारी मंचचे थाळीनाद आंदोलन गाजले होते.स्थानिक दैनिकांसह सर्व पत्रकारांनी या आंदोलनाचे स्वागत केले होते.समविचारीच्या प्रयत्नांने 'हायटेक' बसस्थानकाचे काम सुरु झाल्याने सर्वपक्षीय नेत्यांनी समविचारी प्रमुख बाबा ढोल्ये,राज्य सरचिटणीस संजय पुनसकर,केशवजी भट,मनोहर गुरव, या सर्वांचे अभिनंदन केले आहे.त्याचबरोबर यापुढील जनतेच्या प्रश्नावर समविचारीच्या आंदोलनात निपक्ष भावनेने सहभागी होण्याची ग्वाही दिली असल्याचे समविचारीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
....................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या

news.mangocity.org