राणेंच्या अटकेवर केंद्र सरकारचे मौन


राणेंच्या अटकेवर केंद्र सरकारचे मौन.

राणेंच्या अटकेवर केंद्र सरकारचे मौन


नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री नारायण राणे त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्य सरकारने २४ तासात कारवाई करत केल्यामुळे केंद्र सरकार व सत्ताधारी भाजप हबकून गेल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. केंद्र सरकारच्या वतीने अजूनही कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. भाजपने मात्र हा लोकशाहीवरील हल्ला असल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

राणे यांना अटक केल्यानंतर लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते विनायक राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून राणे यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी केली. हे पत्र मिळताच पंतप्रधान कार्यालयाकडून प्रतिसाद देण्यात आला व केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे मांडावे असे राऊत यांना सांगण्यात आल्याचे समजते. राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेले विधान शोभनीय नाही. राणेंची भाषा मर्यादेचे उल्लंघन करणारी होती. आता त्यांना केंद्रीय मंत्री पदावर राहण्याचा राहण्याचा अधिकार नाही. मर्यादा सोडून बोलणारे मंत्री समाजाला काय देऊ पाहत आहेत हे  समजण्याच्या पलिकडील आहे. त्यांनी पंतप्रधान मोदी यांचाही अपमान केला आहे. राणे यांना मंत्रीपदावरून काढून टाकावे व त्यांचा राजीनामा देण्यास सांगावे, असे विनायक राऊत यांनी मोदी यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

शिवसेनेने राणे प्रकरणावरून थेट पंतप्रधान मोदी यांनाच पत्र लिहिले असल्यामुळे भाजपची कोंडी झाली आहे. पंतप्रधान मोदी यांनी केंद्रातील नव्या मंत्र्यांना जन आशीर्वाद यात्रा काढण्यास सांगितले आहे.  याच जनआशीर्वाद यात्रेत राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे केंद्र सरकारला राणेंच्या अटकेवर नेमकी कोणती प्रतिक्रिया द्यवी समजलेले नाही. एकाही मंत्राने यावर भाष्य केलेले नाही. राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनीही अटकेचा निषेध केला आहे.  संविधानाच्या मूल्यांची पायमल्ली केल्याची टीका नड्डा यांनी केलआहे. या कारवाईमुळे ना भाजप घाबरेल, ना जन आशीर्वाद यात्रा थांबेल. भाजप राजकीय लढाई लोकशाही पद्धतीनेच लढते त्यामुळे जन आशीर्वाद यात्रा सुरूच राहील, असे नड्डा यांनी सांगितले.

‘घटनात्मक मूल्यांचे उल्लंघन’

भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी मात्र राणे यांच्या अटकेचा निषेध केला. राणे यांना झालेली अटक ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यांनी केलेले वक्तव्य टाळता आले असते मात्र त्यांच्यावर केलेली कारवाई निंदनीय आहे. महाराष्ट्रातील ४२ पैकी २७ मंत्र्यांवर कुठल्या ना कुठल्या पद्धतीचे गुन्हे आहेत मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही. शिवसेनेचे नेते उघडपणे आक्षेपार्ह बोलतात पण त्यांच्यावर कारवाई केलेली नाही. राणेंवर अटकेची कारवाई करणे योग्य नाही. हा लोकशाहीवरील हल्ला आहे, अशी टीका पात्रा यांनी  केली.

....................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या

news.mangocity.org