निकाल वाढूनही अकरावी ‘कट ऑफ’ कायम


निकाल वाढूनही अकरावी ‘कट ऑफ’ कायम

निकाल वाढूनही अकरावी ‘कट ऑफ’ कायम


पहिल्या यादीत १ लाख १७ हजार ८८३ विद्यार्थ्यांना महाविद्यालय

मुंबई : अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची पहिली प्रवेश यादी शुक्रवारी जाहीर झाली असून पहिल्या फे रीत १ लाख १७ हजार ८८३ विद्यार्थ्यांना पसंतीक्रमानुसार महाविद्यालय मिळाले आहे. दहावीचा निकाल आणि गुणही वाढले असले तरी मुंबई महानगर परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांतील प्रवेश पात्रता गुणांमध्ये (कट ऑफ) मात्र फारशी वाढ झालेली नाही. अनेक महाविद्यालयांतील पात्रता गुण गेल्यावर्षीपेक्षाही घटल्याचे दिसत आहे.

केंद्रीय प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या एकूण १ लाख ९७ हजार १७१ जागांसाठी १ लाख ९१ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. त्यापैकी १ लाख १७ हजार ८८३ विद्यार्थ्यांची पहिल्या यादीत वर्णी लागली आहे. पहिल्या गुणवत्ता यादीत ४८ हजार ७८८ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय मिळाले आहे. तर १८ हजार ८०४ विद्यार्थ्यांना दुसऱ्या आणि १२ हजार ७९९ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय मिळाले आहे.  पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक आहे. दुसऱ्या पसंतीक्रमापासून खालील पसंतीक्रमाची महाविद्यालये मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश हवा असल्यास विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रक्रीयेद्वारे संबधित वेळापत्रकानुसार प्रवेश निश्चिात करायचा आहे.

यंदा दहावीचा शंभर टक्के  निकाल आणि त्याचबरोबर ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. त्यामुळे यंदा महाविद्यालयांचे प्रवेश पात्रता गुण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. बहुतांश नामांकित महाविद्यालयांतील प्रवेश पात्रता गुण हे ९० टक्क्यांपेक्षा अधिक असले तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत एखाद्याच टक्याने वाढ झाली आहे तर काही महाविद्यालयांमध्ये दीड ते दोन टक्क्यांनी पात्रता गुण कमी झाल्याचे दिसत आहे.

................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या

news.mangocity.org