श्रावणात फुलबाजार कोमेजला!


श्रावणात फुलबाजार कोमेजला!

श्रावणात फुलबाजार कोमेजला!


निर्बधांमुळे मागणीत घट; झेंडूची विक्री ३० ते ३५ रुपये दराने

मुंबई : दरवर्षी श्रावणात विविध प्रकारांच्या फु लांना प्रचंड मागणी असते. या काळात ८० ते १०० रुपये प्रतिकिलोने विकला जाणारा झेंडू यंदा मात्र अवघा ३० ते ३५ रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. करोनामुळे बंद असलेली मंदिरे, धार्मिक उत्सव, पूजाअर्चा यावर असलेली मर्यादा यामुळे फुलांच्या मागणीत मोठी घसरण झाली आहे. परिणामी, फु लांचे दरही घसरले आहेत.

श्रावण महिना हा धार्मिक महिना म्हणून ओळखला जातो. या काळात उपवास, व्रतवैकल्ये, पूजा, विधी याला मोठे प्राधान्य दिले जाते. धार्मिक स्थळांना भेटी दिल्या जातात. त्यामुळे फुलांची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढते. मात्र यंदा हे चित्र बदलले आहे. करोनामुळे राज्यातील मंदिरे बंद आहेत. त्यामुळे भाविकांना मंदिरांमध्ये जाता येत नाही. तसेच कोरोना र्निबधांमुळे धार्मिक उत्सव आणि विधी यावरही मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे फुलाची मागणी थेट ५० टक्क्यांनी घसरल्याची व्यथा फुलबाजारांतील व्यापाऱ्यांनी मांडली.

‘मागणीबरोबरच आवकही तितकीच कमी झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पूरस्थितीमुळे यंदा तेथून येणारी फुले कमी झाली आहेत. मागणी आणि आवक यांचे गुणोत्तर काहीसे समान असल्याने दर ३० – ४० रुपयांवर स्थिरावला आहे. अन्यथा आवक वाढली असती तर फुलांचे भाव कोसळून व्यापारी अधिक अडचणीत आले असते,’ असे दादर घाऊक फुलबाजारातील व्यापारी राजेंद्र हिंगणे यांनी सांगितले.

‘श्रावणात दादरची बाजारपेठ इतकी रिकामी कधीच पहिली नाही. यंदा फुलांना मागणी नसल्याने फुलबाजारात शुकशुकाट आहे. सरकारने निर्बंध शिथिल केले तर श्रावणात झालेले नुकसान आम्हाला  गणेशोत्सवात भरून काढता येईल,’ असे येथील फूल व्यापाऱ्यांनी सांगितले.

दर (प्रतिकिलो)

  • झेंडू – ३० रुपये
  • शेवंती – ५० रुपये
  • गुलछडी – ८० रु पये
  • गुलाब – २ रुपये

(प्रतिनग)

बाजाराची स्थिती अत्यंत वाईट आहे. यंदा  ग्राहक नाहीत. शिवाय पावसामुळे भिजलेली फुले दर पाडून विकावी लागतात. मंदिर खुले करण्यास सशर्त परवानगी द्यावी. कारण फूल व्यवसायावर व्यापाऱ्यांचेच नाही तर शेतकऱ्यांचेही पोटपाणी अवलंबून आहे. किंबहुना शेतकरी, वाहतूकदार, मोठे व्यापारी, छोटे व्यापारी, हार विक्रेते, सजावटकार अशी संपूर्ण साखळीच अडचणीत आली आहे. या हजारो विक्रेत्यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा विचार करून धार्मिक बाबींवरील निर्बंध सरकारने शिथिल करायला हवे, अशी मागणी करण्यात आली आहे.

मनोज पुंडे, अध्यक्ष, माँसाहेब मीनाताई ठाकरे फूल मंडई

....................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या

news.mangocity.org