उत्कृष्ट आयटीआय पुरस्कार यवतमाळ येथील संस्थेला






उत्कृष्ट आयटीआय पुरस्कार यवतमाळ येथील संस्थेला

पुणे : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे  दिल्या उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) पुरस्कारांमध्ये यवतमाळच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर औरंगाबादची शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था द्वितीय आणि कुर्ला येथील डॉन बॉस्को खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे.

संचालनालयाचे संचालक दि. अं. दळवी यांनी या पुरस्कारांची घोषणा प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली. २०१९-२० या वर्षासाठी संचालनालय स्तरावरून प्रक्रिया राबवून राज्यस्तरीय समितीने संस्थांची निवड के ली.  विभागीय पुरस्कारांमध्ये मुंबई विभागात मुंब्रा येथील अहमद अब्दुल्ला खासगी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती विभागातील मोशी येथी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागपूर विभागात नागपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पुणे विभागात सांगली येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औरंगाबाद विभागात औरंगाबाद येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), नाशिक विभागात जळगाव जिल्ह्यातील टेहू येथील सहजीव शिक्षण प्रसारक मंडळाची औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुरस्काराची मानकरी ठरली आहे.

.....................................
------------------------------

www.freshnewz.in



Comments