राज्यातील सर्व खासगी शाळांत 15 टक्क्यांनी फीमध्ये कपात, संस्थांनी नकार दिल्यास पालकांनी काय करावे ?

राज्यातील सर्व खासगी शाळांत 15 टक्क्यांनी फीमध्ये कपात, संस्थांनी नकार दिल्यास पालकांनी काय करावे ?
राज्यातील सर्व मंडळाच्या सर्व शाळांना निर्णय लागू
इयत्ता 12 वी पर्यंतच्या सर्व मंडळाच्या खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये या निर्णयानुसार 2020-21 या एका वर्षासाठी एकुण शुल्काच्या 15 टक्के शुल्क कपातीचा निर्णय तत्काळ अंमलात आला आहे. हा निर्णय राज्यातील सर्व मंडळाच्या सर्व शाळांना लागू असणार आहे. ज्या पालकांनी पूर्ण शुल्क अदा केले आहे, त्यांचा 15 टक्के परतावा पुढच्या तिमाही हप्त्यात समायाेजित करावा. शुल्क समायोजन अशक्य असल्यास पालकांना ते परत करावे, असे निर्णयात म्हटले आहे.
विद्यार्थ्यास आभासी वर्गातून निलंबित करण्यास मनाई
एखाद्या संस्थेने 15 टक्के शुल्क कपातीस नकार दिल्यास पालकांना विभागीय शुल्क नियामक समितीकडे दाद मागता येणार आहे. तसेच शुल्क अदा केले नाही म्हणून निकाल राखून ठेवणे किंवा विद्यार्थ्यास आभासी वर्गातून निलंबित करण्यास मनाई केली आहे.
योगशाळा, व्यायामशाळा, ग्रंथालय यांचा वापर झालेला नाही
गेले वर्षभर विद्यार्थी आभासी वर्गात आहेत. त्यामुळे प्रयोगशाळा, व्यायामशाळा, ग्रंथालय यांचा वापर झालेला नाही. वापर नाही तर मग त्याचे शुल्क विद्यार्थ्यांकडून घेणे नफेखोरी किंवा व्यापारीकरण होईल, अशी समज शिक्षण संस्थांना निर्णयात दिली आहे.
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
Comments
Post a Comment