शृंगारतळीजवळ एसटी बस कलंडली



 शृंगारतळीजवळ एसटी बस कलंडली


 शृंगारतळी : गुहागर आगाराची चिपळूणकडे जाणारी एस.टी.बस शृंगारतळी जवळ रस्त्याच्या कडेच्या भरावात रविवारी सकाळी अडकून कलंडल्यानंतर पुन्हा एक एस.टी.बस अशीच कलंडण्याची घटना घडली असून नव्याने बनविलेला हा महामार्ग धोकादायक असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पाटपन्हाळे महाविद्यालय समोरील गडगोबा नावाच्या देवस्थानाला वाचविण्यासाठी ग्रामस्थांच्या मागणीनुसार कंत्राटदाराने बाजूला असलेल्या दरडी तोडून रस्ता तयार केला आहे. रुंदीकरण करताना मातीचा मोठा भराव टाकून रुंदीकरण केले. याच ठिकाणी गुहागर आगाराची एस.टी.बस रुतून एका बाजूला कलंडली या बसला त्या नंतर जेसीबी लाऊन बाहेर काढावे लागले. त्या नंतर दुसऱ्याच दिवशी गुहागर आगराने अक्कलकोटकडे जाणारी बस लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच सोडली. तिही याच ठिकाणी टाकलेल्या भरावात रुतून बसली व त्यामुळे एका बाजूला कलंडली एसटी जेसीबीने काढण्यात आली. 


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments