वैभववाडी : ज्येष्ठ साहित्यिक, गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचे निधन
वैभववाडी : ज्येष्ठ साहित्यिक, गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचे निधन
वैभववाडी :-ज्येष्ठ साहित्यिक, गझलकार, जिल्ह्याचे सुपुत्र मधुसूदन नानिवडेकर यांच्या हृदयविकाराच्या धक्क्याने रविवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.एक प्रतिभावंत कवी, साहित्यिक, पत्रकार अशी मधुसूदन नानिवडेकर यांची ओळख होती. अखिल भारतीय गझल संमेलनाचे ते माजी अध्यक्ष होते. तसेच त्यांनी नानिवडे गावचे सरपंच पद भूषवले होते.त्यांचे मूळ गाव नानिवडे आहे. परंतु ते सध्या तरळे येथे वास्तव्याला होते. ते मनमिळावू व हसतमुख स्वभावाचे असल्यामुळे त्यांचे अनेकांशी स्नेहाचे संबंध होते. त्यांच्यावर नानिवडे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी एक, मुलगी असा परिवार आहे.
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा