गवत फवारणीच्या औषधावरून झालेल्या वादातून एका वृध्दावर कोयतीने वार

 




 गवत फवारणीच्या औषधावरून झालेल्या वादातून एका वृध्दावर कोयतीने वार 


 गवत फवारणीच्या औषधावरून झालेल्या वादातून एका वृध्दावर कोयतीने वार केल्याची घटना शनिवारी १० जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास संगमेश्वर तालुक्यातील मुर्शी - रेणुसेवाडी येथे घडली. याप्रकरणी तीन जणांविरोधात देवरूख पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.देवरूख पोलीस स्थानकातून दिलेल्या माहितीनुसार, याबाबत राजाराम संभाजी शेलार (६५) यांनी फिर्याद दिली आहे. विठ्ठल रेणुसे, महेश रेणुसे व मालती रेणुसे अशी गुन्हा दाखल केलेल्या तिघांची नावे आहेत. राजाराम शेलार हे शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शेतामध्ये गवत फवारणीचे औषध मारण्यासाठी गेले होते. यावेळी महेश रेणुसे व मालती रेणुसे गवत फवारणीच्या औषधाचा आम्हाला त्रास होतो हे सांगण्यासाठी गेले होते.यावरून वादावादी होऊन  त्यामध्ये हा प्रकार घडला


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments