स्वाभिमानीचे शोले स्टाईल आंदोलन…




 स्वाभिमानीचे शोले स्टाईल आंदोलन…



बुलडाणा:-जिल्ह्याच्या चिखली नगर परिषदेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत त्याची चौकशी करावी आणि नगर परिषद मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांनी आज मोबाईल टॉवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.चिखली नगर परिषदने शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून विकास कामे केली आहे. मात्र, बिल अगोदर काढले आणि कामे काहीच नाही. तर काही ठिकाणी विकासकामे केल्याचा बनाव आणून नुसतीच बिले काढली आणि कामे केलीच नाही. त्यामुळे नगर परिषदेमध्ये भ्रष्टचार झाला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष केले असून मुख्याधिकारी यांना तात्काळ निलंबित करावे, अशी आंदोलन कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत टॉवर खाली उतरणार नसल्याचा निर्धार स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी  केला आहे.

....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

टिप्पण्या

news.mangocity.org