संतापजनक! पोटच्या मुलीवर अत्याचार करून विष पाजले, नराधम बापाला अटक
संतापजनक! पोटच्या मुलीवर अत्याचार करून विष पाजले, नराधम बापाला अटक
बुलडाणा: पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून नराधम बापाने पीडित मुलीला विष पाजल्याची संतापजनक घटना बुलडाण्यात घडली आहे. या प्रकरणी नराधम पित्याविरुद्ध रायपूर पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.रायपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत २७ मे च्या संध्याकाळी ही भयंकर घटना घडली. १६ वर्षांची मुलगी एकटी घरी असताना ४१ वर्षीय बापाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. घडलेली घटना कोणाला सांगितली तर ठार मारण्याची धमकी देऊन तिला मारहाणही केली. इतक्यावरच न थांबता या नराधमानं अत्याचाराचा प्रतिकार करणाऱ्या मुलीला विषारी औषध पाजले. पीडित मुलीला उपचारासाठी बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.या घटनेची माहिती मिळताच रायपूर पोलीस बुलडाणा सामान्य रुगणालयात पोहोचले व पीडितेचा जबाब नोंदविला. या प्रकरणी रायपूर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात बलात्कार, पोक्सो व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला काल रात्री अटक करण्यात आली आहे. आरोपीला आज बुलडाणा न्यायालयात हजर केले गेले. त्यावेळी न्यायालयानं पुढील दोन दिवसासाठी त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment