धक्कादायक! आईसक्रीमधून स्वतःच्याच ३ मुलांना खायला घातले विष; एकाचा मृत्यू




 धक्कादायक! आईसक्रीमधून स्वतःच्याच ३ मुलांना खायला घातले विष; एकाचा मृत्यू


घरगुती वादातून एका व्यक्तीने आपल्याच तीन मुलांना विष खायला घातल्याची धक्कादायक घटना मुंबईमध्ये घडली आहे. मानखुर्द येथील एका व्यक्तीने आपल्या तीन मुलांना उंदीर मारण्याचे औषध खायला घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आईस्क्रीममध्ये उंदीर मारण्याचे औषध मिसळून तीन मुलांना देण्यात आल्याचे उघड झाले आहे. यामध्ये दुर्दैवाने ५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. तर अन्य २ मुलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.कौटुंबिक वादातून त्या व्यक्तीने आईस्क्रीमधून उंदीर मारण्याचे औषध त्याच्या तीनही मुलांना दिले. त्यानंतर ५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला तर ७ आणि २ वर्षाच्या मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलांच्या आईच्या तक्रारीवरून मानखुर्द पोलिसांना गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करण्यात येत आहे.“मानखुर्द येथील एका व्यक्तीने कौटुंबिक वादातून हे पाऊल उचचले आहे. आईसक्रीम द्वारे विष दिल्याने ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. मुलांच्या आईच्या तक्रारीनंतर भारतीय दंड संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे,” असे मानखुर्द पोलिसांनी सांगितले.


....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

टिप्पण्या